घरमहाराष्ट्रजयंत पाटील यांनाच विरोधी पक्षनेता व्हायचे होते, पण..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोपरखळी

जयंत पाटील यांनाच विरोधी पक्षनेता व्हायचे होते, पण…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोपरखळी

Subscribe

मुंबई – मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनाच विरोधी पक्षनेता व्हायचे होते. पण त्यांना ते होता आले नाही, ते अजित पवार यांना देण्यात आले, असा टोला लगावला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भाषणात जयंत पाटील यांन तुम्ही मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली पण दादाना विचारले का?, असा प्रश्न केला. पुढे त्यांनी जयंत पाटील काल राष्ट्रीय प्रवक्त्यासारखे बोलत होते असे सांगत जयंत पाटील यांनाच विरोधी पक्षनेता व्हायचे होते. पण त्यांना ते होता आले नाही, ते अजित पवार यांना देण्यात आले. या ठिकाणी दादांची दादागिरी चालणारच, असा टोला त्यांनी लगावला.

- Advertisement -

गद्दार असतो तर … –

यावेळी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. काँग्रेसला जवळ करायचे नाही, त्यांना जर कधी जवळ करायची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन असे बाळासाहेबांनी म्हटले होते. आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. आम्ही गद्दार असतो तर आमच्या स्वागतासाठी एवढी मोठी गर्दी झाली असती का?, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला.

- Advertisement -

एक से भले दो –

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना ते एकटे सर्वांना पुरुन उरायचे. देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन असे म्हणायचे. देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि ते मलासुद्धा घेऊन आले. आता तर आम्ही दोघे आहोत, ‘एक से भले दो’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -