घरताज्या घडामोडीकेंद्र सरकारच्या मदतीने राज्याचा विकास, हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

केंद्र सरकारच्या मदतीने राज्याचा विकास, हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

Subscribe

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘ कावड यात्रे’ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत भगवान भोले शंकराचा जयघोष केला. हिंगोलीमधील जाहीर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निती आयोगाच्या बैठकीबरोबरच पीएम नरेंद्र मोदींचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या मदतीने राज्याचा विकास होणार, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

सोमवारी नांदेड आणि हिंगोली दौऱ्यामध्ये शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत शक्तीप्रदर्शन केलं. भाषणाच्या सुरूवातीलाच शिंदेंनी संतोष बांगर यांनी सभेसाठी जमलेली गर्दी पाहून आश्चर्य वाटल्याचं सांगितलं. चालायला रस्ता नव्हता एवढी गर्दी होती. या भागात अनेक वर्ष आपण संतोष सोबत काम करताय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांचं कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या बैठकीचा आणि मोदींनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या विश्वासाचा देखील उल्लेख केला.

- Advertisement -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या राज्याला पुढे घेऊन जा. या राज्याची प्रगती करा, या राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जा. तुम्हाला कसलीच कमी पडू देणार नाही. केंद्र सरकार तुमच्या राज्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं असेल असंही सांगितलंय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही संदर्भ यावेळेस शिंदेंनी दिला. गृहमंत्र्यांकडे सहकार खातं आहे. त्यांनीही सांगितलंय की या राज्याच्या विकासात काहीही कमी पडू देणार नाही. राज्य आणि केंद्र सरकार मिळून काम करेल. हे डबल इंजिनचं सरकार आहे. काल मी नीति आयोगाच्या बैठकीत होतो. हजारो कोटींचे प्रस्ताव आपण केंद्र सरकारला पाठवलेत. आपल्या राज्याचे हे प्रस्ताव केंद्र सरकार मान्य करेल असा मला विश्वास आहे, असं शिंदे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीत मुखी भगवान भोलेनाथाचा जयघोष करित तसेच हाती भगवा झेंडा आणि त्रिशूळ घेऊन हजारो शिवभक्त आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे देखील सहभागी झाले होते. याप्रसंगी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार संजय राठोड, आमदार बालाजी कल्याणकर तसेच हजारोंच्या संख्येने हिंगोलीकर शिवभक्त उपस्थित होते.


हेही वाचा : हिंगोलीतील ‘कावड यात्रे’त मुख्यमंत्री शिंदे यांचा सहभाग, ‘भगवान शंकरा’चा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -