Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी आषाढी वारीच्या नियोजनासाठी १० कोटींची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

आषाढी वारीच्या नियोजनासाठी १० कोटींची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Subscribe

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. तसेच वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत ५ वरून १० कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता २५ वरून ५० लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे.

आषाढी वारीच्या नियोजनासाठी १० कोटींची तरतूद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीच्या पुर्वतयारीसाठी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी दुप्पट केला आहे, तत्काळ वितरीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

सर्व अधिकारी अॅक्शन मोडमध्ये

- Advertisement -

नियोजनात कोणत्याही प्रकारचं खंड पडू नये, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वच्छता, साफसफाई, सार्वजनिक शौचालय, अंघोळीची व्यवस्था, घाटाची स्वच्छता आणि पूर्ण पंढरपूर शहर स्वच्छ आणि नीटनेटके रहायला पाहिजे. यासाठी इतर महापालिका आणि नगरपालिका त्यांच्याकडूनही मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूर्ण योजना आणि मॅनपॉवर दुप्पट करून योग्य नियोजन करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. सर्व अधिकारी अॅक्शन मोडमध्ये आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर सज्ज

आषाढीच्या यात्रेच्या येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर पूर्णपणे सज्ज आहे. टोलमाफी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे टोलमाफी आणि ज्यादा गाड्या देखील सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना कुठलीही गैरसोय आणि अडचण होणार नाही. यासंदर्भातील सर्व काळजी आपण घेतली आहे, असं शिंदे म्हणाले.

- Advertisement -

पंढरपूरमधील रस्त्यांसाठी निधी दिला आहे. त्यातून पंढरपूर नगरपालिका आणि आजुबाजुच्या रस्त्यांचे डांबरीकरण करा. त्यामध्ये नगरपालिकेचा रस्ता, ग्रामपंचायतीचा रस्ता असे हद्दीच्या विषयातून रस्त्यांची कामे मागे ठेवू नका. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर चिखल किंवा राडा-रोडी दिसता कामा नये याची दक्षता घ्या, असेही शिंदे सांगितले.


हेही वाचा : गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्प 2024 मध्ये पूर्ण करावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


 

- Advertisment -