घरताज्या घडामोडीआम्ही गद्दारी नाही गदर केलाय, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

आम्ही गद्दारी नाही गदर केलाय, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

Subscribe

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गद्दार आणि खोके यावरूनही त्यांनी विरोधकांना सुनावलं. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली, आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर आहे. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्त्वाचं आहे. आपण सगळे बाळासाहेबांचे निष्ठावंत भक्त आहोत. त्यांचे खरे वारसदार, विचारांचे वारसदार, वारसा हा विचारांचा असतो तो जपायचा असतो. आम्ही विचारांचा वारसा जिवापाड जपला आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचे पाईक आम्ही आहोत. गद्दारी झाली आहे, पण ती २०१९ ला झाली. ज्या निवडणुका आपण लढवल्या त्यानंतर जी आघाडी केली. त्याचवेळी गद्दारी झाली. बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली. हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी केली. या राज्याच्या मतदाराशी गद्दारी केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

एका बाजूला बाळासाहेबांचा आणि मोदींचा फोटो लावल्यामुळे लोकांनी तुम्हाला मतदान केलं पण त्यांच्या मताला तुम्ही नाकारलं म्हणून महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही गद्दारी केली. तुम्ही विश्वासघात केलाय. तुम्ही गद्दारी केली आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणताय. आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर आहे. गदर म्हणजे क्रांती, उठाव होय. महाराष्ट्रातील जनतेनं जाणलेलं आहे. त्यामुळे आम्ही गद्दार नाही, बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. हे आम्ही अभिमानाने आणि छातीठोकपणे सांगतो, असं शिंदे म्हणाले.


हेही वाचा : तुम्ही सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकलात, एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -