घरताज्या घडामोडीऔरंगाबादमध्ये नव्या ७२ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार पार

औरंगाबादमध्ये नव्या ७२ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार पार

Subscribe

औरंगाबादमध्ये नव्या ७२ रुग्णांची वाढ झाली असून कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार १४१ इतका झाला आहे.

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत असून आज औरंगाबादमध्ये ७२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २ हजार १४१ झाली आहे. तर यापैकी १ हजार २७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले परतले आहेत. तर १०८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता ७५९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आज, मंगळवारी प्रशासनाने दिली आहे.

याठिकाणी आढळले रुग्ण

आज, मंगळवारी आढळलेल्या रुग्णांत वडगाव कोल्हाटी १, बजाजनगर, मोरे चौक ३, पंढरपूर परिसर १, बारी कॉलनी २, रोशन गेट ३, कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ १, नागसेन नगर, उस्मानपुरा १, भवानी नगर, जुना मोंढा १, मिल कॉर्नर १, संजय नगर, मुकुंदवाडी २, असेफिया कॉलनी १, बुद्ध नगर, जवाहर कॉलनी १, जाधववाडी १, पेठे नगर, निसर्ग कॉलनी १, नारेगाव १, एन-११, मयूर नगर, हडको १, बिस्म‍िला कॉलनी १, रेहमानिया कॉलनी २, एन-आठ सिडको १, हर्सुल परिसर २, सिल्लेखाना, क्रांती चौक १, बंजारा कॉलनी २, कटकट गेट, शरीफ कॉलनी १, एसटी कॉलनी, कटकट गेट २, संजय नगर, बायजीपुरा १, गणेश कॉलनी, मोहनलाल नगर ४, वसंत नगर, जवाहर कॉलनी १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, समता नगर २, पडेगाव १, रोहिणी नगर १, न्याय नगर १, गादिया ‍विहार २, शिवाजी नगर १, गारखेडा परिसर ३, अशोक नगर,एमआयडीसी, मसनतपूर २, व्हीआयपी रोड, काळीवाडा १, सिटी चौक २, युनुस कॉलनी १, नूतन कॉलनी १, रवींद्र नगर १, दशमेश नगर १, अरिहंत नगर १, विद्या नगर १, एन चार , गुरू साहनी नगर १, अंबिका नगर १, पोलीस कॉलनी, मुकुंदवाडी १, एन सहा, सिडको १ कैलास नगर १, रोकडा हनुमान कॉलनी १, जटवाडा रोड परिसर १, अन्य १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि ४६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक : रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -