घरताज्या घडामोडी'...तर मी राजीनामा देईन'; विरोधकांना दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

‘…तर मी राजीनामा देईन’; विरोधकांना दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Subscribe

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पहिल्या चार दिवसांत अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात येत आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पहिल्या चार दिवसांत अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात येत आहे. त्यानुसार, विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन करत “पन्नास खोके एकदम ओके तर खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके”, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. या घोषणाबाजीला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. “५० खोके सोडा 50 रुपये जरी दिले असतील ना तर मी राजीनामा देईन”, अशा शब्दांत केसरकरांनी प्रत्युत्तर दिले. (deepak kesarkar reaction on opposition raises slogans against eknath shinde in maharashtra assembly monsoon session)

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली जात आहे. “मुख्यमंत्री निवडीमध्येही आणि वर्तमानपत्रात जे वाचतो ते या ठिकाणी घोडेबाजर होता की बैलबाजार, जे म्हटले गेले की खोके खोके एकदम ओके ओके ते काय होते. म्हणचे खरे असेल की खोटे असेल मला माहिती नाही. पण माध्यमांच्या माहितीनुसार, हे सर्व खरे आहे”, असे राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत म्हटले.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांच्या या वक्यव्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी “50 खोके सोडा 50 रुपये जरी दिले असतील ना तर मी राजीनामा देईन. आम्ही आमच्या तत्तवासाठी भांडलो आहोत. तत्त्वासाठी भांडण आणि त्यांना डिवचंण यामध्ये काहीच शंका नाही. सत्ता गेल्याने विरोधकांना दुःख झाले. वाईट वाटताना दुसऱ्याला किती बदनाम करावे यालासुद्धा मर्यादा असतात आणि आपण पायऱ्यांवर बसला कधीही आक्षेप घेतला नाही”, असे केसरकर यांनी म्हटले.

विरोधकांच्या घोषणा

- Advertisement -
  • फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी
  • ईडी सरकार हाय हाय
  • पन्नास खोके, पन्नास खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके
  • आले रे आले, गद्दार आले

हेही वाचा – आरजेडीचे आमदार सुनील सिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा; फ्लोअर टेस्टमध्ये अडचण येण्याची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -