Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू - दीपक केसरकर

फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू – दीपक केसरकर

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आम्ही आमची भूमिका मांडू, असं शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर म्हणाले.

फडणवीसांनी आम्हाला स्वत:हून संरक्षण दिलं

दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार सुरू आहे. माझे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. रात्री १२ वाजताही फडणवीस माझा फोन उचलतात. आज आम्ही एकटे पडलो असून त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यामध्ये काय बिघडलं. फडणवीसांनी आम्हाला स्वत:हून संरक्षण दिलं असून भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळतंय, असं केसरकर म्हणाले.

आमच्या भावनेचा अंत पाहू नका

- Advertisement -

शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकत दिली जातेय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण ते आता शिवसेना संपवत आहेत. एकनाथ शिंदे हेच आमच्या गटाचे नेते असल्याचा पुनरुच्चार केसरकर यांनी केला. आमच्या भावनेचा अंत पाहू नका, यापुढे जशास तसं उत्तर देऊ अशी निर्वाणीची भाषा केसरकरांनी वापरली आहे.

राऊत यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नये

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शिंदे गटावर टीकास्त्र सोडत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांचा राऊत यांच्याबद्दल राग आहे. आम्ही जे निवडून आलो ते भाजप-शिवसेनेच्या युतीच्या जिवावर आलो आहोत. राऊत यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नये, असं दिपक केसरकर म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा : जीआर जनतेच्या भल्यासाठीच, सुप्रिया सुळेंचं जीआरला समर्थन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -