घरट्रेंडिंगदिपक केसरकर तुम्हीच शिवसेना, महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला : महेश तपासे

दिपक केसरकर तुम्हीच शिवसेना, महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला : महेश तपासे

Subscribe

'शरद पवारसाहेबांवर (Sharad Pawar) शिवसेना (Shiv sena) संपवण्याचा आरोप करणारे दिपक केसरकर (Deepak Kesarkar) तुम्हीच बंडखोरी करून शिवसेना व महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे', असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

‘शरद पवारसाहेबांवर (Sharad Pawar) शिवसेना (Shiv sena) संपवण्याचा आरोप करणारे दिपक केसरकर (Deepak Kesarkar) तुम्हीच बंडखोरी करून शिवसेना व महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे’, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिंदे गटाकडून बंडखोर आमदारांचे (Revolt MLAs) प्रवक्ते दिपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दोनवेळा त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. (Deepak Kesarkar You tried to destabilize Shiv Sena Maharashtra says Mahesh Tapase)

दिपक केसरकर यांनी संवाद साधताना शिवसेना संपवण्यामागे संजय राऊतांच्या मागून शरद पवारसाहेब यांचा हात आहे असा आरोप केला होता. या आरोपाला महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “दिपक केसरकर तुम्ही राष्ट्रवादीत होता त्यावेळी सन्मानाने जबाबदारी देण्यात आली होती. आणि पवारसाहेबांना हे करण्याची गरज नाही. त्यांच्यासमोर राज्य आणि देशातील अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यामागे व्यस्त आहेत” असे महेश तपासे यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचा विजय’; न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंचे नवे ट्विट

मनसेसोबत घरोबा करण्याचा विचार

- Advertisement -

“तुमचे बंडखोर आमदार सुरतमार्गे गुवाहटीला घेऊन गेले आणि महाराष्ट्र (Maharashtra) अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता मनसेसोबत (MNS) घरोबा करण्याचा विचार सध्या तुमचा सुरू आहे. त्यामुळे बंडखोर सेना आमदार मनसेचे आमदार होणार की भाजपसोबत जाणार याची उत्सुकता जनतेला आहे”, असेही महेश तपासे यांनी म्हटले.

“शिवसेना नेते संजय राऊत यांना आज ईडीने समन्स बजावले आहेत. महाराष्ट्रात मोदी सरकारविरोधात आवाज उठवला त्या सर्वांच्या मागे ईडी लावण्याचं काम कुणी केलं याचंही उत्तरही दिपक केसरकर द्यावे” असे आवाहनही महेश तपासे यांनी केले आहे.


हेही वाचा – हा शिवसेनेच्या दोन गटांतील अतिशय अंतर्गत विषय – चंद्रकांत पाटील

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -