घरताज्या घडामोडीनागपुरातून नागो गाणार यांना पाठिंबा, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नागपुरातून नागो गाणार यांना पाठिंबा, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Subscribe

राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघ हा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला असून दुसरीकडे नागपुरच्या शिक्षक मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. यावेळी नागपुरमध्ये नागो गाणार यांना भाजपचा पाठींबा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिक्षक परिषदेने नागो गाणार यांना उमेदवारी दिली आहे. वर्षानुवर्षे ही जागा शिक्षक परिषद लढत आहे. भाजप आणि मित्रपक्ष त्यांना समर्थन देत असतात. यावेळी देखील आम्ही पूर्ण समर्थन नागो गाणार यांना दिले आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, नागपूरमध्ये ठाकरे गट आपला उमेदवार मागे घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून गंगाधर नाकाडेंना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ताबेंना भाजपकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. परंतु हीच शक्यता लक्षात घेत भाजप नेत्या शुभांगी पाटील यांनाही नाशिक पदवीधरमधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर काल शनिवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नाशिक पदवीधरसाठी भाजपचा तांबेंना की शुभांगी पाटलांना पाठिंबा?; बावनकुळे म्हणाले…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -