घरमहाराष्ट्र'फडणवीस हे दमदार नेतृत्व; पवारशाही नष्ट...'; सदाभाऊ खोत यांची टीका

‘फडणवीस हे दमदार नेतृत्व; पवारशाही नष्ट…’; सदाभाऊ खोत यांची टीका

Subscribe

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दमदार नेतृत्व आहे, असे मी यशवंतरावांच्या समाधीच्या साक्षीने सांगतो. आता फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करुन लुटारूंचा बंदोबस्त करु शकतात, अशी खोत यांनी यावेळी केली.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दमदार नेतृत्व आहे, असे मी यशवंतरावांच्या समाधीच्या साक्षीने सांगतो. आता फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करुन लुटारूंचा बंदोबस्त करु शकतात, अशी खोत यांनी यावेळी केली. ( Devendra Fadnavis is a strong leader he will destroyed Pawarshahi Sadabhau Khots criticism )

खोत म्हणाले की, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेणाऱ्या शरद पवारांवीच सहकारात गढ्या निर्माण करुन त्यांच्या सरदारांनी गावगाड्यातील शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोपही खोत यांनी यावेळी केला आहे.

- Advertisement -

सदाभाऊ खोत यांची कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक आंबेकरी, बापूराव जगदाळे, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

सदाभाऊ खोत म्हणाले की, कऱ्हाडमधून साताऱ्यापर्यंत आम्ही गावगाड्याचे प्रश्न घेऊन पदयात्रा काढत असून, या तीन दिवसांत सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देईल, अशी आशा आहे. तीन दिवसांत निर्णय झाला नाही तर आम्ही वाहनाने मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार आहोत. शेतऱ्यांना पारतंत्र्यांत ठेवणारे काँग्रेसने केलेले कायदे संपुष्टात आणा, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्या, अशी आमची सरकारला मागणी आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत त्यांच्या नेतृत्वाखाली कारडहून टाळ मृदुंगाच्या नादात वारी शेकऱ्यांची या पदयात्रेला सुरुवात झाली.

( हेही वाचा: मी पुढची निवडणूक… पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण )

शेतकऱ्यांच्या मागण्या काय? 

ऊसाला चार हजार रुपये भाव देणारा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा. दोन साखर कारखान्यांमधील 25 किलोमीटर हवाई अंतर असावे, अशी अट आहे. हे अंतर कमी करावे. शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबिल स्कोअर ची अट बँकांनी काढून टाकावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. कांद्याच्या प्रश्नासंदर्भात नाफेडने हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने कराड ते सातारा अशी पदयात्रा काढण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -