Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'तिकडे देवेंद्र फडणवीस बसलेत, तुम्हाला काहीही होणार नाही'; कोल्हापुरात नितेश राणेंचे हिंदुंना...

‘तिकडे देवेंद्र फडणवीस बसलेत, तुम्हाला काहीही होणार नाही’; कोल्हापुरात नितेश राणेंचे हिंदुंना आश्वासन

Subscribe

'आपल्या माता भगिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर, तुम्ही न सांगता एकत्र या, बिनधास्त लढा. तुम्हाला जे काय करायचे ते करा, तिकडे देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. तुम्हाला काहीही होणार नाही, याची खात्री देतो', असे नितेश राणे यांनी म्हटले.

‘आपल्या माता भगिनींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर, तुम्ही न सांगता एकत्र या, बिनधास्त लढा. तुम्हाला जे काय करायचे ते करा, तिकडे देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. तुम्हाला काहीही होणार नाही, याची खात्री देतो’, असे आश्वासन नितेश राणे यांनी दिले. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून 13 वर्षीय मुलगी बेपत्ता आहे. या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय, यामागे लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ठाण्यात ठिय्या आंदोलन करत घटनेचा निषेध केला आहे. (Devendra Fadnavis is sitting there nothing will happen to you Nitesh Rane assurance to Hindus in Kolhapur)

कोल्हापुरातील या घटनेप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी जन आक्रोश मोर्चा काढला आहे. यावेळी त्यांनी सर्व हिंदुंना एकत्र येण्याचे आव्हानही त्यांनी केले. तसेच, “जेव्हा आपण हिंदू म्हणून जागे होऊ तेव्हा असे धरणे द्यायची गरज भासणार नाही. त्यानंतर आपल्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही. तुम्ही मुस्लीम धर्माची एक अशी घटना दाखवा, जिथे त्यांना धरणे करण्याची वेळ आलीये. ते कधीच संधी देत नाहीत. कोणी त्यांच्या कुठल्याही व्यक्तीकडे वाकड्या नजरेने पाहिले, धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिले तर, ते त्याला जिवंत ठेवत नाहीत. पण आपल्याला टोप्या घालाव्या लागतात. आपल्याला घोषणा द्याव्या लागतात. आपल्याला किरण पावसकर लागतात. आपल्याला नितेश राणे लागतात. त्यानंतरच आपण कायतरी करतो. हीच तर आपली सोकांतीका आहे”, असे नितेश राणे यांनी म्हटले.

- Advertisement -

“आम्ही भाषण देण्यासाठी इथे जमलेलो नाही. चुलीत जाऊदे ती आमदारकी, डब्यात जाऊदेती खासदारकी कोणी मोजत नाही. मी मरताना माझ्या नावाला आमदार लावणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेलाय हे सांगितले जाईल. म्हणून हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात, हिंदू म्हणून आपल्या धर्माचे कसे रक्षण करणार आहात. हे आज ठरवण्याची गरज आहे”, असेही त्यांनी म्हटले.

“असंख्य उदाहरणे आहेत, आम्ही महाराष्ट्रात फिरत असताना अशी असंख्य उदाहरणे नजरेसमोर येतात. काय अधिकार आहे आपल्याला जय श्री राम म्हणण्याचा. आपल्या घरात माता-भगिनी सुरक्षीत नसतील तर, हे गळ्यात भगवा लटकवण्याचा काय अधिकार आहे. हेच मला तुम्हाला प्रत्येकाला विचारायचे आहे”, असे सवालही यावेळी नितेश राणे यांनी विचारले.

- Advertisement -

“काय उत्तर द्यायचे त्या अंबाबाईला. तिच्या या नगरीमध्ये आपण हिंदू म्हणून आपल्या माता-भगिनींना घरामध्ये सुरक्षीत ठेऊ शकलो नाही, तर काय उत्तर द्यायचे. कुठल्या तोंडानी या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचे. कुठल्या तोंडानी शाहु महाराजांसमोर नतमस्तक व्हायचे. कुठल्या तोंडानी शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे. आपण हिंदू म्हणून दरारा कधी निर्माण करणार, हिंदू म्हणून भिती कधी निर्माण करणार? …या राज्यातील सगळेच पोलीस सारखे नसतात, पण काही नालायक असतात. त्यामुळे त्यांना शिक्षाही मिळणारच हे आश्वासन यावेळी मी देतो. आज राज्यमध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक नाही, हसन मुश्रिफ मंत्री नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. महाविकास आघाडीचे सरकार नाहीये”, असा टोलाही यावेळी राणेंनी उद्धव ठाकरे यांनी दिला.

“तुम्ही हिंदू म्हणून एकत्र या, हिंदू म्हणून तुमचा आवाज उठवा, पुढे तुम्हाला सुखरुप घरी कसे पोहोचवायचे हे नितेश राणे पाहून घेईल हेही मी याठिकाणी आश्वासन देतो. कारण तिकडे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. आज खरे हिंदुत्ववादी म्हणून गृहमंत्री पदावर बसलेले आहेत. आपल्या हिंदुंकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे जागेवर ठेवणार नाही. मी उगाचच्या सुक्या धमक्या देणारा नाही. माझं आडणाव ठाकरे नाही, राणे आहे. आपल्या माता भगिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर, तुम्ही न सांगता एकत्र या, बिनधास्त लढा. तुम्हाला जे काय करायचे ते करा, तिकडे देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. तुम्हाला काहीही होणार नाही, याची खात्री देतो”, असे आश्वासनही यावेळी नितेश राणे यांनी दिले.


हेही वाचा – कोल्हापुरात ‘लव्ह जिहाद’चा संशय, भाजपाच्या नितेश राणेंचे ठिय्या आंदोलन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -