घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदिंडोरीतील नगरसेवक शिंदे गोटात दाखल; नाशिकचेही नगरसेवक द्विधा मनःस्थितीत

दिंडोरीतील नगरसेवक शिंदे गोटात दाखल; नाशिकचेही नगरसेवक द्विधा मनःस्थितीत

Subscribe

ठाणे : शिवसेनेचे सर्व नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून काळजी करण्याचे कारण नाही, असा विश्वास दोनच दिवसांपूर्वी नाशिक दौर्‍यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता नाशिक आणि दिंडोरीचे नगरसेवक माझ्यासोबत असल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने राऊतांच्या डॅमेज कंट्रोलला एकप्रकारे शिंदे गटाकडून आव्हानच देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि नाशिक जिलयातील ग्रामीण भागातील काही नेते, नगरसेवकांनी शिंदे यांची भेट घेतल्याचही समजत. ठाण्यातील ६६ माजी नगरसेवकांनी शिंदेंगटात प्रवेश केल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा हादरा मानला जात आहेत.

नगरसेवक द्विधा मनःस्थितीत

नाशिकच्या दोन आमदारांंनंतर खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेने भाजपसोबत युती करण्याबाबतची भूमिका मांडली आहेे. राज्यातील सत्तांतरानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांमध्येही संभ्रमावस्था असून अनेकांनी शिंदे गटाला समर्थन दर्शवले आहे. मात्र, पक्ष कारवाईमुळे याविषयी उघडपणे बोलण्यास कोणी तयार नाही. अजूनही पक्षप्रमुख शिंदेगटाशी जुळवून घेतील, अशी या नगरसेवकांना अपेक्षा असून तसे न झाल्यास नाशिकमध्येही शिवसेनेत भूकंप अटळ मानला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -