घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना हे आठवतं का? व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंचा सवाल

उद्धव ठाकरेंना हे आठवतं का? व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंचा सवाल

Subscribe

Nitesh Rane Tweet Against Uddhav Thackeray | ठाकरे गट एका बाजूने पुन्हा नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे भाजपाकडून पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक जुना व्हिडीओ आज ट्वीटरवर शेअर केला असून तुम्हाला हे आठवतंय का असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Nitesh Rane Tweet Against Uddhav Thackeray | मुंबई – शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेल्याने ठाकरे गटासाठी मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. यावरून ठाकरे गटाने पुन्हा रणशिंग फुंकले असून पक्षनाव आणि पक्षचिन्ह परत मिळवणारच असा निर्धार केला आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले आहे. ठाकरे गट एका बाजूने पुन्हा नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे भाजपाकडून पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक जुना व्हिडीओ आज ट्वीटरवर शेअर केला असून तुम्हाला हे आठवतंय का असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारकडून सीबीआयकडे हस्तांतरणास मंजुरी

- Advertisement -

16 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री सुरतकडे जाणाऱ्या दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकांची पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावाकडून मारहाण करत निघृण हत्या करण्यात आली. गावात दरोडेखोर शिरले असल्याच्या अफवेवरून या साधूंची पोलिसांच्या देखत हत्या करण्यात आली होती. या हत्येचा व्हिडीओ तेव्हा समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला होता. व्हिडीओतील अतिसंवदेनशील चित्रफीत पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सत्तेवर आल्याच्या पाच महिन्यांनंतरच हा प्रकार घडला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

हाच व्हिडीओ भाजपा नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शेअर करत उद्धव ठाकरेंना हे आठवतं का?? तुम्ही मुख्यमंत्री होता.. हेच का तुमचं हिंदुत्व?असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मिंधे, बाजारबुणगे, भंपक, धोकेबाज, ढोंगीबाज; ठाकरे गटाकडून महायुतीवर वाग्-बाण

उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात काल उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोगॅम्बो असा उल्लेख करत भाजपाच्या हिंदूत्त्वावर बोट ठेवले. ‘मागील २५ वर्ष आपण एकमेकांच्या विरोधात होतो. मी आजही हिदूत्व सोडलेले नाही. मी भाजपाला सोडले आहे, हिंदूत्वाला नाही. भाजपा म्हणजे हिंदूत्व नाही आणि त्याचे हिंदूत्व म्हणजे आमचे हिंदूत्व नाही. जे आम्हाला मान्य नाही. मला वडिलांनी (बाळासाहेब ठाकरे) शिकवल्यानुसार हे हिंदूत्व नाही. बाळासाहेबांनुसार राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदूत्व आहे. भाजपाचे हिंदूत्व म्हणजे लढाई लढवा, आपापसात वाद घाला. कुटुंब व पक्षात भांडण लावा आणि सत्ता मिळवा,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या टीकेलाच त्यांनी पालघरचा व्हिडीओ शेअर करत प्रतिप्रश्न विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -