राज्यात गोवंश हत्या होऊ देऊ नका, विधानसभा अध्यक्षांचे पोलीस महासंचालकांना पत्र

rahul narvekar

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी पोलीस महासंचलकांना पत्र लिहिले आहे. १० जुलै रोजी बकरी ईद असून या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ देऊ नका, असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. (Don’t allow cattle slaughter in the state, letter of the Speaker of the Legislative Assembly to the Director General of Police)

हेही वाचा – व्हिप झुगारणाऱ्यांवर कारवाईसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून तक्रार दाखल

शिवसेना- भाजप युतीच्या काळात महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत गोमांस विक्री करणे आणि ठेवणे बेकायदा असून असे करणाऱ्यास पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. केवळ, स्थानिक प्रशासनाकडून Fit To Slaughter असं प्रमाणपत्र घेऊन वासरू आणि गाईची हत्या केली जाऊ शकते.

विश्व हिंदू परिषदेने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना गोवंश हत्येसंदर्भात निवदेन दिलं होतं. ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नयेत, असं या पत्रात लिहिलं होतं. यावर विधानसभा अध्यक्षांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले असून त्यात म्हटलं की, “महाराष्ट्रात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू आहे. १० जुलै रोजी बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होण्याची शक्यता आहे. तरी गोवंश हत्या प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपयायोजना कराव्यात.”


हिंदूंच्या भावनांचा आदर करा

एकीकडे देशात धर्मावरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे लोकसभा खासदार आणि AIUDF चे प्रमुख मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी हिंदूंच्या भावनांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. आसामच्या मुस्लिम बांधवांना त्यांनी असं आवाहन केलं आहे.