एकनाथ शिंदेंच्या गटाला 2014 ला युती तोडायची होती, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंसुद्धा सहभागी होते. शिवसेनेच्या कार्यकत्यांनी मुंबईतील कार्यालयातच माझी भेट सुद्धा घेतली.

ashok chavan

शिवसेनेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचं नवं सरकार स्थापन केलं. मविआ सरकार स्थापन झाल्याने भाजपाला धक्का बसला. त्यामुळेच सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं. पण याच माविआ संदर्भांत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

हे ही वाचा – ‘न भूतो न भविष्यति’ अशी दसरा मेळाव्याची तयारी करा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं ते 2014-2019 मध्येच होणार होतं असा गौप्यस्फोट केला आहे. याच संदर्भांत अशोक चव्हाण म्हणाले, भाजपा-शिवसेना (shivsena – bjp) युती काळात शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंसुद्धा सहभागी होते. शिवसेनेच्या कार्यकत्यांनी मुंबईतील कार्यालयातच माझी भेट सुद्धा घेतली.

भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने त्यावेळी. 2019 च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला. पण ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच घेण्यात आली होती असा खुलासाही अशोक चव्हाण यांनी केला. पण यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करणे योग्य राहील असं अशोक चव्हाण यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सुचवलं, पण शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याने पवारांची भेट घेतली नाही. पण या संदर्भात पुढे काय झालं याची माहिती नसल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा – राजस्थानमधील सत्तासंघर्ष हायकमांड दरबारी, अशोक गहलोत घेणार सोनिया गांधींची भेट

2019 च्या निवडणुकांदरम्यान प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचार केला. त्याचप्रमाणे शिवसेना – भाजप यांनी एकत्रित प्रचार केला पण निवडूंक झाल्यानंतर शिवसेनेने राजकीय खेळी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती करत सरकार स्थापन केले आणि उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.