Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम भय इथले संपत नाही! लसही घेतली, पण कोरोनाच्या भितीने वृद्धाची गळफास घेऊन...

भय इथले संपत नाही! लसही घेतली, पण कोरोनाच्या भितीने वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोनाच्या भितीने आयुष्य संपवले

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोचा वाढता आकडा सर्वांच्या मनात भितीचे सावट उभे करत आहे. राज्यातील रुग्णांची विदारक परिस्थिती पाहून मन हेलावून जात आहे. कोरोनावर लस देखिल आली आहे. ती प्रभावीही ठरत आहे मात्र भय काही संपत नाही. कोरोनामुळे शारीरिकरित्या नुकसान होतच आहे मात्र मानसिकरित्या माणूस अधिक खचत आहे. अशाच मानसिक ताणातून,कोरोना हाईल या भितीने एका वृद्धाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. पुण्यातील इंदापूर गावातील ही घटना आहे. वडिलांच्या आत्महत्येमुळे कुटुंबातील सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

प्रकाश विष्णुपंत भगत असे आत्महत्या करण्याऱ्या वृद्धाचे नाव आहे. प्रकाश भगत हे ६५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश हे कोरोनाच्या भितीत होते. बाहेर सुरु असलेल्या परिस्थितीचा त्यांच्यावर मानसिक ताण आला होता. आठ दिवसांपूर्वी प्रकाश यांनी कोरोना लस घेतली. त्यानंतर त्यांना लसीचे काही दुष्परिणाम दिसून आले. २-४ दिवस घसा दुखणे, अंग दुखणे, खोकला येणे अशी लक्षणे दिसत होती. त्यावर त्यांना औषधोपचारही सुरु होते. मुलाने प्रकाश यांना कोरोना चाचणी करुया सांगितल्यास त्यांनी नकार दिला.

- Advertisement -

शनिवारी रात्री प्रकाश घरी सर्वासोबत जेवले. औषधे खाल्ली आणि झोपायला गेले. घरातील सर्व झोपल्यानंतर प्रकाश यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी कुटुंबातील सर्वजण उठताच त्यांना प्रकाश गळफास घेऊन मृत अवस्थेत लटकलेले पहायला मिळाले. प्रकाश यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. लस घेऊनही अनेक जण आजही घाबरले आहेत. लसीचे होणारे दुष्परिणाम लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहेत. त्यामुळे असे प्रसंग वारंवार पाहण्याची वेळ सर्वांवर येत आहे.


हेही वाचा – गजबचं! ‘sorry पता नही था कोरोना की दवा है.’ चोरट्याने चिठ्ठी लिहून केल्या कोरोना लसी परत

- Advertisement -

 

 

- Advertisement -