कसब्यात पैसे वाटपावरून राडा, महिलेला मारहाण केल्याप्रकरणी भाजप समर्थकांवर गुन्हा दाखल

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. पुणेकरांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. परंतु मतदान होण्याच्या आधी म्हणजेच काल रात्री कसब्यात पैसे वाटपावरून राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. महिलेला मारहाण केल्याप्रकरणी भाजप समर्थकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील अ.क्र. ६३० गंजपेठ भागातील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर यांनी पैसे न घेतल्यामुळे मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळे या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मिठगंज पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली होती. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंजपेठ येथील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर यांनी पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आली. दुपारच्या वेळेस कार्यकर्ते पैसे वाटत होते. परंतु हरिहर यांना हटकल्या प्रकरणी त्यांना राग आला. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी तब्बल २५ ते ३० लोकांनी येऊन गंज पेठेत येऊन नागरिकांना शिवीगाळ आणि मारहाण केली. याबाबत काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी देखील आरोप केले आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंज पेठेत भाजपचे नगरसेवक हरिहर आणि त्यांच्या साथीदारांनी पैसे वाटले. या प्रकाराला विरोध केल्याने दर्या कांबळे यांच्या मुलांना, बहिणीला आणि नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार निंदनीय आहे, असं माजी आमदार रमेश बागवे म्हणाले. दरम्यान, सकाळी ११ पर्यंत चिंचवडमध्ये १०.४५ टक्के मतदान आणि कसबा पेठेत ८.२४ टक्के मतदान करण्यात आले आहे.


हेही वाचा : जनतेचा पैसा जनतेसाठी लावा, पालिकेतील फिक्स्ड डिपॉझिटबाबत फडणवीसांचं प्रत्युत्तर