घरठाणेटीएमसीमधील महत्वाची रिक्त पदे भरा

टीएमसीमधील महत्वाची रिक्त पदे भरा

Subscribe

परिवहन सभापतींचे मुख्यमंत्र्यांना साकडे, निवेदनाद्वारे केली मागणी

ठाणे । ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमधील गेली कित्येक वर्षे अनेक महत्वाची रिक्त आहे. ती पद भरावी यासाठी टीएमसी परिवहन सभापती विलास जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे साकडे घालते आहे. यामध्ये त्यांनी परिवहन उपव्यस्थापक, वाहतूक अधीक्षक यासह महत्वाच्या अकरा पदांचा उल्लेख त्या निवेदनात करण्यात आलेला आहे.

ठाणे महापालिकेची स्वतःची परिवहन सेवा आहे पण अपुर्‍या बसेस नादुरुस्त बसेस आदी कारणास्तव ठाणेकर नागरिकांना खाजगी बसेसचा आधार घ्यावा लागत आहे. ठाणे परिवहन सेवेचा दिवसाला साधारणपणे दहा लाख रुपयांचा नुकसान होत आहे. पण त्याला काही प्रमाणत जबाबदार स्वतः परिवहन सेवाही आहे. परिवहन सेवेवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक ती महत्वाची अधिकारी वर्गाची पदे मागील काही वर्षांपासून रिक्त आहेत. यात 2012 पासून परिवहन उपव्यवस्थापक हे पद असून तब्बल दहा वर्षांपूर्वी या पदावरील व्यक्ती निवृत्त झालेली आहे. तेंव्हा पासून या पदावरचकोणाचीच नियुक्ती करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

तदपूर्वी 2010 साली वाहतूक अधीक्षक आणि 2005 पासून कार्यशाळा व्यवस्थापक, उपव्यवस्थापक ही पदे रिक्त आहेत. तर 2016 साली लेखपाल आणि 2006 साली उपलेखपाल ही पासून रिक्त आहे. 2016 मध्ये कर्मचारी व प्रशासन अधिकारी हे रिक्त आहे. तर 2020 साली कामगार कल्याण अधिकारी हे तर कार्यालय अधीक्षक हें पद ही 2016 नंतर भरले गेले नाही. अशा प्रकारे परिवहन सेवेतील अत्यंत महत्वाची अशी ही पदे वर्षोनुवर्षे रिक्त असल्याने काम करण्यार्‍या कर्मचार्‍यांवर कोणाचाच वचक राहिला नाही. त्यातच या पदावर नियुक्ती करण्याबाबतही इतक्या वर्षात प्रयत्न झालेले नाहीत. याचा परिणाम म्हणजे नियमितपणे त्यांच्या बसेस आगारातून बाहेरच पडत नाही आहे नादुरुस्त बसेस तसेच आगारात खितपत पडलेल्या उभ्या असतात परिणामी बसेसची कमतरता भासते आणि प्रवाश्याना या खाजगी बसेसचा आधार घ्यावा लागतो. असेही निवेदनात नमूद केले आहे. तसेच ही पदे त्वरित भरा अशी मागणी ही परिवहन सभापतींनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -