घरमहाराष्ट्रगुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न; भुजबळांची सरकारवर मिश्कील टिप्पणी

गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न; भुजबळांची सरकारवर मिश्कील टिप्पणी

Subscribe

महाराष्ट्रातून एकामागून एक प्रकल्प गुजरातला जात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छनग भुजबळ यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली आहे. वेदांता- फॉक्सकॉनसारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळवला गेला. तेव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असं म्हणणाऱ्यांनी अजून एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही, या उलट फॉक्सकॉर्न पाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आधीचा 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि टाटा एअर बसचा 22 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजराला दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आला, आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ 2 हजार कोटीचा प्रकल्प दिला, हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉर्न दिला मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला अशी मिश्कील टीका छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केली आहे. (foxconn to gujarat popcorn to maharashtra chhagan bhujbals criticism of eknath shinde devendra fadanvis govt)

छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्रातले रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात आहेत. मी स्वत: त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिले होते की, तुम्हाला सर्व सुविधा देऊन महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये प्रकल्प घेऊन या एचएलएलच्या सोबत या एअरबसचे उत्पादन करा, यासाठी तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य केलं जाईल, मात्र तो प्रकल्प गुजरातला गेला, विमान दुरुस्त करणारा सॅफ्रोनचा प्रकल्प देखील हैदराबादला गेला असही ते म्हणाले.

- Advertisement -

यासोबत मोठे मोठे प्रकल्प गुजरातला आणि प्रदुषणाचे प्रकल्प महाराष्ट्राला हा कोणता न्याय? महाराष्ट्रातून डायमंड मार्केट सुरतला, कपडा मार्केट सुरतला, बेलापूरचे रासायनिक कारखाने दहेजला, आयटी हब अहमदाबादला, टाईल्स व्यवसाय वापीला, मुंबई बंदराची जहाजे वळवली कच्छच्या अदानी पोर्टला, जलद गतीने अजून व्यवसाय गुजरातला नेण्यासाठी बुलेट ट्रेन ज्याचा अधिक खर्च महाराष्ट्रावर आहे असा आरोपही भुजबळांनी केला आहे. तसेच देशाच सध्या काय चालू आहे त्याचा विचार करत आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार रहावं लागणार आहे असं आवाहनही भुजबळांनी कार्यकर्त्यांना केले आहे.


२०२४ च्या निवडणुकीत मविआला उमेदवारही मिळणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -