घरमहाराष्ट्रMonsoon Update : कोकणात नैऋत्य मान्सूनची हजेरी, हवामान विभागाची माहिती

Monsoon Update : कोकणात नैऋत्य मान्सूनची हजेरी, हवामान विभागाची माहिती

Subscribe

कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आज कोकणात नैऋत्य मान्सून दाखल झाल्याने पावसाची प्रतिक्षा संपली आहे. मान्सूनने संपूर्ण गोवा व्यापला असून संपूर्ण कोकणातही मान्सून चांगल्या प्रकारे सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे येत्या 24 तासात कोकणात चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्याच येत आहे. दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात लवकरचं संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. मान्सून सध्या कोकणात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिसाला मिळाला आहे. मात्र यावर्षी महाराष्ट्रात मान्सून तीन दिवस उशीरा दाखल झाला आहे. (monsoon arrives in konkan information from indian meteorological department)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून अखेर कोकणात दाखल झाल्याने मान्सूनसाठी पुढील वाटचाल अनुकूल असणार आहे. त्यामुळे कर्नाटकात अडकलेला मान्सूनचा प्रवास कोकणापर्यंत आल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. हा नैऋत्य मान्सून अरबी समुद्रासह गोवा, कोकणातील काही भाग आणि कर्नाटकातही सक्रिय झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान येत्या दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. हा मान्सून 31 मे ते 7 जून दरम्यान दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात सर्व भागात आणि दोन दिवसांत मुंबईमध्ये मान्सून चांगला सक्रिय होण्याचा अंदाज आहे.

मुंबईसह उपनगरातही मान्सून दाखल

कोकणासह मुंबई उपनगरातही काल मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रासह अन्य भागात चांगल्याप्रकारे सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. काल मुंबईतील दक्षिण मुंबई, मध्य मुंबईतील अनेक भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यात ठाणे, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, दहिसर, माहिम, माटुंगा, कल्याण, नवी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागिरकांना मान्सूनच्या सरींमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.


Monsoon Update : मुंबई, ठाण्यासह अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, लोकल सेवेवर परिणाम

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -