घरताज्या घडामोडीआयएनएस प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना हायकोर्टाचा दिलासा, १४ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

आयएनएस प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना हायकोर्टाचा दिलासा, १४ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

Subscribe

आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी जमा केलेल्या निधीची माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अपहार केला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून किरीट सोमय्यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. सोमय्यांच्या जामिन अर्जावर हायकोर्टात सुनावणी पार पडली असून सुनवाणी १४ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच सोमय्यांना दिलासा मिळाला असून त्यांना १४ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. परंतु जर सोमय्यांना अटक झाली तर ५० हजार रुपये वैयक्तिक जामीनावर सोडण्यात यावे असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतील माता रमाबाई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस युद्धनौकेसाठी जमा केलेल्या पैशाचा अपहार केला असल्याचा आरोप माजी सैनिक भोसले यांनी केला आहे. यावरुन सोमय्यांवर चौकशी करण्यात येत आहे. सोमय्यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुनावणी करण्यात आली असून १४ एप्रिलपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. पुढील सुनावणी पर्यंत सोमय्या पिता-पुत्रांना अटक करण्यात येऊ नये असे कोर्टाचे निर्देश आहेत.

- Advertisement -

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या आयएनएस प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. आयएनएस युद्धानौका भंगारात जाऊ नये यासाठी सोमय्यांनी सेव्ह आयएनएस अशी मोहिम राबवत कोट्यवधी रुपये गोळा केले. ५७ कोटी रुपेय गोळा झाले होते ते त्यांनी राजभवनात जमा न करता वैयक्तिक कारणासाठी खर्च केले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. सोमय्यांनी मुंबईत आणि राज्यात पैसे गोळा केले होते. मुंबईतील रेल्वे स्थानकातही त्यांनी पैसे गोळा केले होते. हजारो रुपये माजी सैनिकांनीसुद्धा दिले असून चर्चगेट स्टेशनबाहेर एका दिवसात त्यांनी ११ हजार रुपये गोळा केले असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आमचा न्यायालयावर विश्वास – सोमय्या

कोर्टाच्या निर्णयावर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर पोलिसांनी आम्हाला चौकशीसाठी बोलवले तर आम्ही चौकशीसाठी जाऊ, चौकशीला सहकार्य करु असे सोमय्या म्हणाले आहेत. आम्हाला जी जी माहिती सांगितली ती दिली असे सोमय्या म्हणाले आहेत. तसेच राऊतांनी माझ्याविरोधात ५७ कोटींचा आरोप केला परंतु कोर्टात ५७ पैसेचा पुरावा देऊ शकले नाही असा पलटवार सोमय्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रवादीकडूनच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला डळमळीत करण्याचा प्रयत्न, आशिष शेलारांचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -