घरमहाराष्ट्रपुणेHind Kesari : महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने मारले हिंद केसरीचे मैदान; समाधान पाटील विजेता

Hind Kesari : महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने मारले हिंद केसरीचे मैदान; समाधान पाटील विजेता

Subscribe

मुंबई : मानाची समजली जाणारी हिंद केसरी या राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने बाजी मारली. महाराष्ट्राने सलग दुसऱ्या वर्षी हिंद केसरीची गदा खेचून आणण्यात यश आले हे विशेष. (Hind Kesari The field of Hind Kesari struck by Maharashtras Pattha Samadhan Patil winner)

भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा हिंद केसरी स्पर्धा आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने मैदान मारले आहे. समाधान पाटील यांनी दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत हिंद केसरीवर आपले नाव कोरले. विजेते समाधान पाटील हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

- Advertisement -

सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राला यश मिळाले आहे. 2023 मध्ये झालेल्या स्पर्धेत अभिजीत कटके यांनी हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव करुन विजेतेपद मिळवले होते. अभिजीत कटके हा 2017 सालच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आहे.

समाधान पाटील हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी गावचा रहिवासी आहे. समाधानने 2010 सालपासून पैलवानकी करत आहे. यापूर्वी त्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या सीएम केसरीचा किताब तसेच 2017 सालचा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकवला आहे. त्यानंतर 2024 चा हिंद केसरी किताबावरही नाव कोरलं हे विशेष.

- Advertisement -

हेही वाचा : Guru Pushya Yoga : आज गुरुपुष्यामृत योगात करा ‘हे’ काम; होईल अनेकपट लाभ

सिंकदर शेखच्याच तालुक्यातील समाधान पाटील

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता सिकंदर शेखच्याच मोहोळ तालुक्यात त्याचे गाव. एकाच वर्षात महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी दोन्ही गदा मोहोळ तालुक्यातचं आल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हेही वाचा : Maratha Reservation: जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढलीय; भुजबळांची टीका, म्हणाले, ते मारुतीचं शेपूट…

काय हिंद केसरी स्पर्धा?

अखिल भारतीय ॲमॅच्युअर रेसलिंग फेडरेशन तर्फे देण्यात येणारा हा किताब आहे. हा किताब या फेडरेशन तर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱ्या विजेत्यास दिल्या जातो. या स्पर्धा 1958 पासून सुरू झाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -