घरमहाराष्ट्रआपल्याच राज्याच्या प्रगतीचा दुःस्वास करणे योग्य नाही, चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना...

आपल्याच राज्याच्या प्रगतीचा दुःस्वास करणे योग्य नाही, चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : हिरे व्यापारी मुंबईतील व्यवसाय बंद करून सूरतला स्थलांतरित होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्याला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यापाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांनी, राज्याच्या प्रगतीचा वेग मंदावत असल्याचे म्हटले आहे. त्यावरून चित्रा वाघ संतप्त झाल्या असून. आपल्याच राज्याच्या प्रगतीचा दुःस्वास करणे योग्य नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

हेही वाचा – आता मोदींची जादू चालणार नाही; राऊतांचा घणाघात म्हणाले, यावेळी चित्र बदलेल…

- Advertisement -

राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार असल्याचे सांगितले जात असले तरी, येथील उद्योग अन्य राज्यांत पळविले जात आहेत. दोनशे आमदारांचे सरकार असूनही स्थैर्य देऊ शकलेले नाही. राज्यात प्रचंड अस्वस्थता असून येथे विकास सोडून सर्वकाही सुरू आहे. प्रगतीचा वेग मंदावला आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी लक्ष्य केले. यापूर्वी यशस्वी ठरलेले गृहमंत्री फडणवीस यांचा सध्याची कारकीर्द अपयश आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

यावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2026-27पर्यंत पाच ट्रिलियन डॅालरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा 1 ट्रिलियन डॅालर इतका करण्याचे ध्येय समोर ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत. तुम्ही कशा पद्धतीने वाचन-मनन-चिंतन करून असे शोध लावता हो? असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठरलं! भाजपा 26 तर, शिंदे आणि अजित पवार गटाला 22 जागा; फडणवीसांनी सांगितला लोकसभेचा फॉर्म्युला

महाराष्ट्राच्या विकासाची गती मंदावलेली नाही, उलट आमच्या कार्यकाळात ती सुधारत चालली आहे. पाठीमागे तुम्ही असेच महाराष्ट्रातला हिरे उद्योग सूरतला चालला आहे, म्हणून आवई उठवली होती. राज्याच्या हिरे उद्योगाची चमक अजून कायम आहे. एवढेच नव्हे, तर त्याला आणखी झळाळी मिळाली आहे, ही वस्तुस्थिती आम्ही दाखवल्यानंतर तुम्ही मूग मिळून गप्प बसलात, असेही त्यांनी सुनावले आहे.

त्याही अगोदर राज्य उद्योगांच्या बाबतीत मागे पडल्याची ओरड केली होती. श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून तुमचा बुरखा फाडावा लागला. तुमच्या काळात (मविआ काळात) रखडलेल्या औद्योगिक प्रगतीचे गाडे आमच्या काळात मार्गावर आले, हेच सत्य त्या श्वेतपत्रिकेतून समोर आले. केवळ राजकीय विरोधक सत्तेवर आहेत, म्हणून आपल्याच राज्याच्या प्रगतीचा दुःस्वास करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – काँग्रेसचे भूत वारंवार ‘त्यांच्या’ मानगुटीवर बसते…, संजय राऊत यांचा मोदींवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -