घरमहाराष्ट्रमुंबई ते मडगाव दरम्यान धावणार जनशताब्दी विशेष ट्रेन

मुंबई ते मडगाव दरम्यान धावणार जनशताब्दी विशेष ट्रेन

Subscribe

रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते मडगाव दरम्यान जनशताब्दी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ०११५१ जनशताब्दी सुपरफास्ट विशेष दिनांक १० फेब्रुवारी २०२१ पासून आठवड्यातून ५ दिवस (मंगळवार आणि शुक्रवार वगळता) पुढील सूचना मिळेपर्यंत दादर येथून ०५.२५ वाजता सुटेल आणि मडगावला त्याच दिवशी १४.१० वाजता पोहोचेल. ०११५२ जनशताब्दी सुपरफास्ट विशेष दिनांक १०.२.२०२१ पासून आठवड्यातून ५ दिवस (मंगळवार आणि शुक्रवार वगळता) पुढील सूचना मिळेपर्यंत मडगाव येथून १४.४० वाजता सुटेल आणि दादरला त्याच दिवशी २३.१५ वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबे असतील.

एक व्हिस्टाडोम कोच, दोन एसी चेअर कार आणि 12 द्वितीय श्रेणी आसन अशी संरचना करण्यात असणार आहे. पूर्णपणे आरक्षित सुपरफास्ट विशेष गाडी क्र. ०११५१ साठी आरक्षण सामान्य भाडे दराने दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल. उपरोक्त विशेष गाडीच्या थांब्यांच्या सविस्तर वेळा जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करू शकता. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना, मंदीचा आर्थिक फटका; मुंबई महापालिकेचा ११.५१ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -