मी काहीही चुकीचं केलं नाही, जितेंद्र आव्हाडांचं आक्षेपावर स्पष्टीकरण

Jitendra Awhad

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे. मात्र, अद्यापही मतमोजणीला सुरूवात झालेली नाहीये. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे नेते सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. परंतु या आक्षेपावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी काहीही चुकीचं केलं नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मतदानाच्या पेटीत मतदान टाकलं, त्यानंतर…

जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी साधरणत: १२ ते १२.३० वाजता विधान भवनात पोहोचलो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात गेलो. त्यानंतर मी मतदान केलं. मतदान केल्यानंतर एजंटला मतदान दाखवायचं असतं, ते मी दाखवलं, खरं तर ही प्रक्रिया आहे. मतदान पत्रिका एजंटला दाखवल्यानंतर मी हसलो. कारण त्याला एक वेगळं कारण होतं. मतदान पत्रिका मी तिथेच बंद केली आणि माझ्या खिशात ठेवली. त्यानंतर मी बाहेर आलो आणि मतदानाच्या पेटीत मतदान टाकलं, त्यानंतर मी बाहेर निघून गेलो. परंतु मी गेटपर्यंत आल्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेण्यात आला नव्हता. मात्र, थोड्या वेळानंतर मला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समजलं की, माझ्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

मी काहीही चुकीचं केलं नाही

मी मतदानाची ज्याप्रकारे क्रिया केली आहे. त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची चूक केली आहे. त्यामु्ळे माझं मत बाद व्हावं, असं मला तरी कोणताही गुन्हा वाटत नाही. आम्ही कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाहीये. शेवटी महाराष्ट्राला कळत असेल की नक्की काय घडतंय. यामध्ये काहीही कारण नसताना हे खेळ लांबवर घेऊन जात आहेत. हा सर्व प्रकार वेदनादायी आहे. आम्ही २२ ते २३ वर्ष आमदार आहोत. काहीही कारण नसताना रडीचे डाव दाखवायचे, हे काही बरोबर नाहीये. माझ्या मताप्रमाणे माझ्या हातून कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाहीये. मतदान ज्या व्यक्तिला दाखवायचं असतं नियमाप्रमाणे, जर ते मतदान मी दाखवलं नाही, तर मला माझा पक्ष सहा वर्षांसाठी निलंबित करू शकतो. त्यामुळे माझं राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मी कॅमेऱ्यात मतपत्रिका दाखवलीच नाही

मी मतदानाची क्रिया केली असून मी माझ्या व्यक्तिला मतं दाखवलं. त्यानंतर मी जी माहिती घेतली आहे. त्यामुळे मला असं कळलं आहे की, व्हिडिओतून काहीही दिसत नाहीये. कारण मी कॅमेऱ्यात मतपत्रिका दाखवलीच नाही, असं  आव्हाड म्हणाले.


हेही वाचा : ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा