Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र लोटस ऑपरेशनच्या पाकळ्याच गळून पडल्या; राऊतांचा भाजपला टोला

लोटस ऑपरेशनच्या पाकळ्याच गळून पडल्या; राऊतांचा भाजपला टोला

Subscribe

जनतेनं भाजपचं मिशन लोटस धुळीला मिळवल्याच्या चर्चा असतानाच, आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लोटस ऑपरेशवरुन भाजपला टोला लगावला आहे. ऑपरेशनल लोटसच्या पाकळ्याच गळून पडल्याचं ते यावेळी म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड सुरु आहे. जनतेनं भाजपचं मिशन लोटस धुळीला मिळवल्याच्या चर्चा असतानाच, आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लोटस ऑपरेशवरुन भाजपला टोला लगावला आहे. ऑपरेशनल लोटसच्या पाकळ्याच गळून पडल्याचं ते यावेळी म्हणाले. ( Karnataka Election 2023 The petals of the Lotus operation fell off Sanjay Raut s challenge to BJP )

देशभरात भाजप लोटस ऑपरेशन करतं. पंरतु आता हे जे लोटस होतं त्याच्या पाकळ्याच गळून पडल्यात ते तुम्हाला वाचवता आलं नाही. कर्नाटकच्या जनतेने घेतलेला हा निर्णय भाजपला आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. भारतीय जनता पक्षाला प्रधानमंत्रीपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण यंत्रणा लावून सुद्धा 70 जागाही मिळवता आल्या नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं. ज्या काँग्रेसला तुम्ही पप्पू म्हणत होते त्या काँग्रेसच्या पाठीमागे कर्नाटकची जनता उभी राहिली आणि संदेश दिल्याचं, राऊत म्हणाले.

- Advertisement -

राऊत म्हणाले की,  भविष्यात कधीही निवडणुका घ्या आम्ही तर म्हणतो एकाच वेळेला सगळ्या 14 महानगरपालिका निवडणुका घ्या. माझं आव्हान आहे. या सरकारमध्ये, मुख्यमंत्र्यांमध्ये, उपमुख्यमंत्र्यांमध्ये, केंद्र सरकारमध्ये लोकांना सामोरे जायची हिंमत असेल तर त्यांनी मुंबईसह ठाणे, कल्याण -डोंबिवली, मीरा- भाईंदर, पुणे, नागपूर, नाशिक संभाजीनगर अशा 14 महानगरपालिकांच्या निवडणुका तुंबवून ठेवलेल्या आहेत त्या घ्याव्यात आमची तयारी आहे कधीही घ्या, परंतु तुमची हिंमत नाही, असं म्हणत राऊतांनी थेट केंद्राला आव्हान दिलं.

कर्नाटकमध्ये जरी विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असला तरी Evm विषयी आमची भूमिका कायम आहे.बॅलेट पेपर मतपत्रिका हाच लोकशाहीचा सगळ्यात मोठा लोकशाही सिद्ध करण्याचा मार्ग आहे. आम्ही महाराष्ट्रात देखील जिंकू विधानसभा महानगरपालिका तरीही आमची मागणी कायम आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा:  मोठी बातमी : उद्धव ठाकरेंपासून मला तोडण्याचा प्रयत्न, संजय राऊत असं का म्हणाले? )

या राज्यामध्ये दंगलीची भीती अजिबात राहिलेली नाही गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची अजिबात चिंता नाही. अहमदनगरमध्ये अकोल्यात दंगली उसळल्या. दंगली उसळल्या कारण संपूर्ण सरकार आणि गृहमंत्री हे फक्त 24 तास राजकारणामध्ये अडकलेले आहेत त्याच्यामुळे पोलीस वाऱ्यावर कायदा वाऱ्यावर म्हणून ददंगलखोर मुकाट, असं म्हणत राऊतांनी कायदा- सुव्यवस्थेवर बोट ठेवलं आहे.

- Advertisment -