घरताज्या घडामोडीआमच्या शिवसैनिकांनी सोमय्यांची ड्रामाबाजी आणि नौटंकी हाणून पाडली - कोर्लई सरपंच प्रशांत...

आमच्या शिवसैनिकांनी सोमय्यांची ड्रामाबाजी आणि नौटंकी हाणून पाडली – कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या कोर्लईतील १९ बंगाल्यासंदर्भात अर्ज दाखल करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीत पोहोचले होते. यादरम्यान कोर्लई ग्रामपंचायत परिसरात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी किरीट सोमय्यांनी कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांच्याकडे अर्ज देऊन ते रेवदंडा पोलीस ठाण्याकडे अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. सोमय्या रेवंदडा पोलीस ठाण्याकडे निघाल्यानंतर कोर्लईतील महिला शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीत गोमुत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केले. तसेच आज फक्त किरीट सोमय्या ड्रामाबाजी आणि नौटंकी करण्यासाठी आली होते, ती आमच्या शिवसैनिकांनी हाणून पाडली आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच मिसाळ यांनी दिली.

सोमय्या आल्यामुळे आमचे कार्यालय झाले अपवित्र 

सरपंच प्रशांत मिसाळ म्हणाले की, ‘आमचे कार्यालय किरीट सोमय्यांनी येऊन अपवित्र केले होते, ते आमच्या महिलांनी गोमूत्र आणि दूधाने पवित्र केले आहे. आमचे जे दैवत हिंदुहृयसम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या कुटुंबावर अशा प्रकारचे आरोप करून भाजपचे कुठेतरी त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र चाललेल आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत, हे आम्ही हाणून पाडणार आहे. पाच वर्ष शिवसेनेची आणि मविआचे सरकार असणार आहे.’

- Advertisement -

‘आम्ही कुठलीही आडकाठी केली नाही’

पुढे मिसाळ म्हणाले की, ‘आम्ही कुठल्याही पद्धतीचे आडकाठी केलेली नाहीये. पोलिसांनी बॅरीगेट्स लावले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅरीगेट्स तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि दोन मिनिट न थांबता एक पत्रक देऊन सोमय्या निघून गेलेले आहेत. त्यांनी काही आम्हाला सांगितलेले नाही. ते घाबरून गेले आहेत.’

‘सोमय्या खाली हात निघून गेले’ 

‘आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना सहकार्य केले होते. आता त्यांना कार्यकर्त्यांना घेऊन येण्याची काही गरज नव्हती. परंतु ते जाणूनबुजून ते कार्यकर्त्यांना घेऊन आलेत. त्यांना माहित नाही की, या तालुक्यात शिवसेनेची केवढी मोठी ताकद आहे. पण आम्ही ती कधी वापरली नाही. आजपर्यंत तीन वेळेला किरीट सोमय्या माहितीच्या आधार ग्रामपंयाचतीत आले होते. पण प्रत्येकवेळेला सहकार्य केले. कधीही आम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अशावेळी बोलावले नाही. आज सुद्धा आम्ही कोणाला बोलावले नव्हते. पण ज्यांना टीव्ही बघून यावे वाटले ते कार्यकर्ते दाखल झाले होते. किरीट सोमय्या काही एक बोलले नाहीत. प्रशांत ठाकूरांनी पत्र काढले त्यांनी स्वतः बघितले आणि त्यांनीच सांगितले, तुमच्याकडे हे ठेवा आणि निघून गेले. काही बोलले नाहीत. आज त्यांना काही बघायचे नव्हते. आज फक्त त्यांना ड्रामाबाजी आणि नौटंकी करायची होती, ती शिवसैनिकांनी हाणून पाडली आहे. त्याच्यामुळे त्यांना काही करता आले नाही. त्यामुळे ते खाली हात निघून गेलेले आहेत,’ असे कोर्लई गावाचे सरपंच मिसाळ म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Kirit somaiya korlai : किरीट सोमय्या कोर्लईत दाखल, ग्रामपंचायतीच्या समोरच भाजप शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -