घरताज्या घडामोडीपन्हाळ गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी भूस्खलन; पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

पन्हाळ गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी भूस्खलन; पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Subscribe

राज्यभरात रविवारी सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, काही भागांच भूस्खलनही झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच या पावसाचा फटका पन्हाळ गडालाही बसला आहे.

राज्यभरात रविवारी सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, काही भागांच भूस्खलनही झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच या पावसाचा फटका पन्हाळ गडालाही बसला आहे. पन्हाळ गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी भूस्खलन झाले आहे. सोमवारी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास भूस्खलन झाले. (landslide near newly constructed road at panhala fort)

रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण

- Advertisement -

भूस्खलन झाल्याने या गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पन्हाळा गडावर जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरील चार दरवाजा येथील नवीन बांधकामा शेजारीच भूस्खलनाला झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

सातत्याने भूस्खलन

- Advertisement -

पन्हाळा गडावर जाणाऱ्या रस्त्यावर सातत्याने भूस्खलन होत असते. गतवर्षी पावसाळ्यातही भूस्खलन झाले होते. त्यावेळी चार दरवाजा जवळच भूस्खलन झाले होते. त्यामुळे हा वर्षभर हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. तेथे अत्याधुनिक पद्धतीने भिंत बांधत रस्ता तयार करण्यात आला.

जवळपास वर्षभर या रस्त्याच्या दुरूस्तीकरणाचे काम सुरू होते. रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर चार-पाच महिन्यांनंतर या मार्गावरील वाहतुक सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, मोठ्या प्रमाणात माती व दगड खाली पडू लागल्याने पुन्हा एकदा या रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हेही वाचा –  दादरच्या स्मृतिस्थळावरील बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले गुलमोहराचे झाड कोसळले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -