घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : अखेर भावना गवळींची नाराजी दूर; राजश्री पाटलांच्या...

Lok Sabha Election 2024 : अखेर भावना गवळींची नाराजी दूर; राजश्री पाटलांच्या प्रचारात सक्रिय होणार

Subscribe

मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. गेली २५ वर्ष लोकांसाठी काम केले आहे. जनतेने टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. संघर्ष करणारा व्यक्ती कधी नाराज होत नाही तो आत्मचिंतन करतो. त्यामुळे मी नाराज नाही, असा खुलासा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार भावना गवळी यांनी केला.

मुंबई : मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. गेली २५ वर्ष लोकांसाठी काम केले आहे. जनतेने टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. संघर्ष करणारा व्यक्ती कधी नाराज होत नाही तो आत्मचिंतन करतो. त्यामुळे मी नाराज नाही, असा खुलासा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार भावना गवळी यांनी केला. भावना गवळी यांनी शनिवारी वाशिममध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारात उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024 Bhavana Gawli ready to do campaign of Rajshree patil)

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने भावना गवळी यांच्या ऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सलग चारवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या गवळी यांना तिकीट नाकारल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर भावना गवळी यांची नाराजी दूर झाली. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना भावना गवळी यांनी आपण नाराज नसल्याचे सांगत यंदाच्या लोकसभेत तिकीट मिळाले नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड राहिला असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कोरोनामध्ये हजारो लोकं मरत असताना, मोदी थाळ्या वाजवायला सांगत होते; काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४०० पारचा नारा पूर्ण करायचा आहे. तसेच राज्यासाठी अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी यापुढे पक्षाचे अधिक जोमाने काम करणार आहे. राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो. शिवसेना पक्षात विद्यार्थीदशेपासून काम करत असून यापुढे काम करत राहणार असल्याचे भावना गवळी यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – BJP Star Campaigner : एकनाथ शिंदे, अजित पवार आता भाजपाचे स्टार प्रचारक नाहीत; काय आहे कारण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -