घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले, नवनीत राणांनी दाखवला...

Lok Sabha 2024 : गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले, नवनीत राणांनी दाखवला मोदींच्या हवेवर अविश्वास

Subscribe

मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका. 2019 मध्ये मी अपक्ष निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडला होता, असं म्हणत भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

अमरावती : मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका. 2019 मध्ये मी अपक्ष निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडला होता, असं म्हणत भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार सुरू होता. याच प्रचारादरम्यान भाष्य करताना नवनीत राणा यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. “कामाला लागा. मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका. एवढी मोठी यंत्रणा असूनही 2019 मध्ये मी अपक्ष निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडला होता”, असे नवनीत राणा म्हणाल्या. विशेष म्हणजे नवनीत राणांनी या वक्तव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सी-व्हिजिल Appवरील तक्रारींचा फडशा

दरम्यान, नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर टीका केली आहे. “भाजपचा अब की बार 400 पारचा नारा हा केवळ निवडणुकीत हवा निर्माण करण्यासाठी दिला जात आहे. मात्र याची खरी कल्पना पक्षाच्या उमेदवारांनाही आहे. म्हणूनच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच मोदींची हवा नाही, हवेत उडू नका अस सांगत भाजपच्या 400 पारच्या फुग्यातील हवा काढून घरचा आहेर दिला आहे”, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.

- Advertisement -

लोकसभेच्या अमरावती मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यासमोर प्रहारच्या बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आरोप-प्रत्यारोप, टीकेचे जोरदार प्रहार, नेत्यांच्या सभा, पदयात्रा यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहचलेला प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी उमेदवारांना निवडणूक प्रचार करता येत नाही.

अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होत आहे. त्यात राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली -चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचपैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत आहे. वंचितने नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार; आता छुप्या प्रचारावर उमेदवारांचा भर

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -