घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : हेलिकॉप्टरमधून निवडणूक अधिकारी पोहोचले गडचिरोलीच्या संवेदनशील भागात

Lok Sabha 2024 : हेलिकॉप्टरमधून निवडणूक अधिकारी पोहोचले गडचिरोलीच्या संवेदनशील भागात

Subscribe

गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे या भागात असलेल्या संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले.

गडचिरोली : राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. 19 एप्रिलला राज्यात लोकसभेचे पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये हे मतदान होणार असून यामध्ये गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे या भागात असलेल्या संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. (Lok Sabha Election 2024 Election officers reach sensitive areas of Gadchiroli by helicopter)

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशी 68 मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे या ठिकाणी 72 निवडणूक पथकाच्या 295 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3-एम.आय.- 17 आणि 4-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : एका कुटुंबात तब्बल 350 मतदार, आसामच्या या घराची सर्वत्र चर्चा

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहचविण्यात येत आहे. त्याशिवाय या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात कर्तव्यपथावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या जवानांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

- Advertisement -

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. दोन दिवसांत या लोकसभेतील प्रचाराचा धुरळा थांबणार आहे. छत्तीसगड सीमेलगत राज्यातील शेवटचे गाव असलेल्या मुल्हेरमुट्टात अजूनही प्रचार यंत्रणा पोहचलेली नाही. गावात पक्षाचे बॅनर, झेंडे दिसत नाहीत. कोणी पोहचले नसल्याने गावकऱ्यांना उमेदवारांची नावेही माहिती नाहीत. तरीही मतदानासाठी सात किलोमीटरची पायपीट आपण करणार असल्याचा विश्वास गावकरी व्यक्त करतात.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : शेतकरी सशक्त होऊ नये यासाठीच खटाटोप, ठाकरे गटाकडून भाजपा जाहीनाम्याचे पोस्टमार्टम

गडचिरोली-चिमुर लोकसभेत बहुतांश विभाग हा नक्षलवादी विभाग असल्याने तो अतिसंवेदनशील भागात मोडतो. त्यामुळे अतिसंवेदनशील असलेल्या भागांमध्ये नक्षलवाद्यांकडूनही कधीही घातपात घडवून आणण्याची शक्यता असते. ज्यामुळे याच भीतीमुळे आज या लोकसभेतील अनेक भागांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांचे एअर लिफ्ट करण्यात आले आहे. अनेक भागांमध्ये मतदान केंद्रावर पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -