घरमहाराष्ट्रLok Sabha Election : लोकसभेत जागा नाही निदान...; रामदास आठवलेंची भाजपाकडे नवी...

Lok Sabha Election : लोकसभेत जागा नाही निदान…; रामदास आठवलेंची भाजपाकडे नवी मागणी

Subscribe

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाला एकही जागा न सोडल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यात ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. मात्र, अवघ्या 24 तासांतच त्यांनी ‘आम्ही देशात एनडीए आणि राज्यात महायुतीसोबत आहोत’ असं सांगत नाराजी दूर झाल्याचे संकेत दिले. यानंतर आता त्यांनी विधानसभेसाठी नवी मागणी केली आहे. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाला एकही जागा न सोडल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यात ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. मात्र, अवघ्या 24 तासांतच त्यांनी ‘आम्ही देशात एनडीए आणि राज्यात महायुतीसोबत आहोत’ असं सांगत नाराजी दूर झाल्याचे संकेत दिले. यानंतर आता त्यांनी विधानसभेसाठी नवी मागणी केली आहे. (Lok Sabha Election 2024 No Seats in Lok Sabha At least seats will be discussed in Assembly Ramdas Athawale’s new demand to BJP)

भाजपाने महायुतीमध्ये लोकसभेसाठी आठवले गटाला एकही जागा दिली नाही. त्यामुळे रामदास आठवले नाराज होते. त्यांनी भाजपाकडे दोन जागा मागितल्या होत्या. यापैकी शिर्डी लोकसभा जागेसाठी ते आग्रही होते. तर सोलापूरची जागा मिळावी अशीही त्यांची इच्छा होती. या दोन्ही ठिकाणी आठवले गटाचे उमेदवार तयार होते. पण भाजपाने तेथे त्यांचे उमेदवार घोषित केले. त्यामुळे रिपाइंचे कार्यकर्ते नाराज झाल्याची भावना रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : वंचितच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांनी वडेट्टीवारांवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता राज्यात प्रत्येक टप्प्यात दोन सभा होणार आहेत. ऐन निवडणुकीत भूमिका बदलणे अतिशय अयोग्य आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे की, केंद्रामध्ये आम्हाला कॅबिनेट मंत्री पद मिळावे. परंतु आम्हाला जागा मिळाली नाही तरी आम्ही राज्यात महायुतीसोबत आहोत आणि देशात एनडीएसोबत आहोत, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

रामदास आठवले म्हणाले की, गेल्यावेळी आमचे सरकार नव्हते. त्यामुळे रिपाईला मंत्रिपद मिळाले नाही. लोकसभेलाही जागा दिली नाही. परंतु विधानसभेत 8 ते 10 जागा मिळतील याबाबत चर्चा केली जाईल. कारण नरेंद्र मोदी हे देशातली लोकशाही बळकट करत आहेत. जनता दलाच्या काळातही पर्याय निर्माण झाला होता. परंतु इंडिआ आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचे काम करत आहे. संविधान बदलणार या अफवा आहेत. काँग्रेसच्या काळात डॉ. बाबासाहेबांच्या इंदू मिलचे काम केले गेले नाही. खरंतर काँग्रेस पक्ष रसातळाला जात असून त्याला वर यायला खूप वेळ लागेल, असा दावाही रामदास आठवले यांनी यावेळी केला.

हेही वाचा – MNS : भाजपाला पाठिंबा देताच राज ठाकरेंना धक्का; पदाधिकाऱ्याचा राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -