घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : प्रचारासाठी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेचे नवीन गीत लॉन्च

Lok Sabha Election 2024 : प्रचारासाठी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेचे नवीन गीत लॉन्च

Subscribe

शिवसेना भवनात नुकताच शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे नवीन गीत लॉन्च केले.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत प्रचाराकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मशाल गीत लॉन्च केले आहे. शिवसेने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मशाल गीत लॉन्च केले आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदरी पडलं. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटला मशाल हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षनाव देण्यात आले. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मशाल गीत तयार केले असून त्याचा प्रचारादरम्यान वापरला जाणार आहे. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray launches Shiv Sena new campaign song in mumbai)

शिवसेना भवनात नुकताच शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे नवीन गीत लॉन्च केले. तसेच, जाहीरनाम्यावर ही भाष्य केले. “शिवसेनेचे नवीन गीत महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर केले आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून मशाल या निशाणीने आमची विजयी सुरुवात झाली. आता सार्वत्रिक निवडणुका आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मशाल हे चिन्ह पोहोचलेले आहे. पण मशाल ही केवळ चिन्ह म्हणून नाही तर, सरकारविरोधात असलेला असंतोष या मशालीच्या रुपाने भडकणार आहे. त्यामध्ये हुकमशाही राजवाट आणि जुमलेबाजी राजवट जळून खाक होईल, असा मला आत्मविश्वास आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“आज शिवसेनेचे गीत जसं सादर केले, तसेच मशालीचे नेमकं चित्र कसं असणार हे देखील तयार केलेले आहे. आगोदरच्या मशाल चिन्हावर आणि आताच्या चिन्हावर फरक आहे. हे मशाल चिन्ही इव्हीएम आणि मतपत्रिकेवर असणार आहे. त्यामुळे मतदारांसमोर जाताना हे चित्र घेऊन जावे असे माझे शिवसैनिकांना आवाहन आहे. आपलं चिन्ह थोडं वेगळं आहे त्यामुळे मतदारांमध्यो कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी आपलं चिन्ह त्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे प्रचारादरम्यान याच चिन्हाचा वापर करावा, अशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार – उद्धव ठाकरे

“जाहीरनामा संयुक्त प्रसिद्ध केला जाणार आहे. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आमच्या जाहीरनाम्यामध्ये असणार आहेत. सध्या काँग्रेसने दिलेला जाहीरनामा सर्वसमावेशक आहे. पण त्यामध्ये आणखी काही टाकायचं असेल तर आम्ही ते करू. शिवाय, सुरूवातील जाहिरातींवर माझे काम चालू आहे. या जाहिरातीच्या कामानंतर आमच्या संयुक्त सभा असतील. एक संयुक्त जाहीरनामा ही आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांनी स्वत: साठी चांगला जाहीरनामा तयार केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी असतील तर, त्याचा आम्ही समावेश करणार आहोत”, असे शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भास्कर जाधवांची थेट मनसैनिकांना साद, पण राज ठाकरेंवर टीका

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -