घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023Live Update : विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले

Live Update : विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले

Subscribe

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू असलेली चर्चा वाचण्यासाठी पेज सतत रिफ्रेश करत राहा.

विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले


शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी सभागृहात मविआ आक्रमक

- Advertisement -

आमदार सातपुते यांच्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख

सातपुतेंच्या वतीने आशिष शेलारांकडून माफी

- Advertisement -

शिरसाटांचा राजीनामा घेतला, मग मलिकांचा का नाही – एकनाथ शिंदे


देशाच्या एकतेला नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या देशात सर्वधर्मीयांमध्ये बंधुभाव आहे. पण काही लोक हिंदुराष्ट्र बनवण्याच्या नावाने द्वेष पसरवीत आहेत-अबू आझमी

ज्या राज्यात आणि देशात शेतकरी निराश असेल, तर ते सरकार बेकार आहे. – अबू आझमी

फक्त धर्माचं राजकारण केलं जातंय. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांपैकी अहमदगर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची नाव बदलून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का? – अबू आझमी

केवळ द्वेषाचे पुजारी बननून राज्यात धर्माचं राजकारण होत आहे – अबू आझमी


समृद्धी महामार्ग हा जालनापासून नांदेड पर्यंत मर्यादीत न ठेवता मुंबई-पुणे-औरंगाबाद-जालना-नांदेड-हैद्राबाद असा करावा. यासाठी केंद्राची तयारी आहे, पण राज्याने परवानगी द्यावी- अशोक चव्हाण


पोलीस भरतीसाठी ग्रामीण भागातील मुलं मुंबईत विद्यापीठाच्या बाहेर ते रस्त्यावर झोपले आहेत. या मुलांना राहण्यासाठी व्यवस्था सरकारने करावी – रोहित पवार


आशिष शेलार यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून झालेल्या बेताल वक्तव्यांचा पाढा


येवला इथे शिवसृष्टी उभारतेय. दोन कोटींचा खर्च आहे. पण या खर्चासाठी अद्याप कोणताही निधी आलेला नाही. – छगन भुजबळ

राज्यपालांनी खेलो इंडियामध्ये पदक विजेत्या खेळाडूंचं कौतूक केलं. पण जवळपास ३०० खेळाडूंचे बक्षिसाचे ११ कोटी ७ लाख रूपये अडवण्यात आले- छगन भुजबळ

राज्यपाल नवे आहेत. पुढच्या वेळी येताना मराठी चार वाक्य बोलावेत. जे खरं आहे त्याची वाच्यता सरकारकडून करून घ्यावी. म्हणजे राज्यपालांच्या भाषणाला बट्टा लागणार नाही- छगन भुजबळ

केंद्राचा अर्थसंकल्पामध्ये आपला किती वाटा आहे? – छगन भुजबळ

केंद्राच्या दोन योजना आहेत. त्यात कुपोषण, बालमजुरी, मानवी सेवा याचा समावेश आहे. या योजनेच महाराष्ट्राला एकही पैसा देण्यात आला नाही. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच जो पैसा दिला तो वापरला नाही- छगन भुजबळ

मुंबई सुंदर व्हावी यासाठी तोडफोड कामे झाली. चांगल्या स्थितीतील डिव्हायडर तोडून त्यावर पुन्हा तीच बांधकाम करण्यात आली – छगन भुजबळ

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण न झाल्याने १ लाख ७० हजार घरकुले दुसऱ्या राज्यात हलवण्यात आली.- छगन भुजबळ

ग्रामविकास पदभरतीचा गोंधळ अद्याप कायम आहे-छगन भुजबळ

वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत एसटीचा फोटो लावून निर्णय वेगवान असं लिहिता पण त्यांचे पगार का वेगवान होत नाही- छगन भुजबळ

राज्यातील कारखाने परराज्यात घेऊन जात आहेत, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढतेय, त्यांना नोकऱ्या देण्यासाठी कारखाने तर पाहिजेत. बेरोजगारी आणि आत्महत्येच्या प्रकरणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. – छगन भुजबळ


बीडमधील १२००० शेतकऱ्यांची खाती गोठवण्यात आली- धनंजय मुंडे

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत १२०० शेतकऱ्यांना चुकीचा विमा देण्यात आल्याचं कारण

एकतर विमा मिळत नाही, चुकीचा विमा तर सोडाच पण ऱ्हास विमा देखील मिळाला नाही- धनंजय मुंडे

जे खाते बेकायदेशीरपणे गोठवलेत ते पुर्ववत करण्यात यावे- धनंजय मुंडे

ज्यांनी खाती गोठवलीत त्यांच्यावर कारवाई व्हावी- धनंजय मुंडे


बाजारसमितीतच एपपीओ उघडण्यात यावेत असे आदेश देण्यात येतील- देवेंद्र फडणवीस


नाफेडला एपीएससी मार्केटमध्ये कांदा खरेदी करण्याचे आदेश द्यावेत- छगन भुजबळ


अणुस्कुरा घाटाचे लवकरच रुंदीकरण होणार, १० कोटींची तरतूद

कोल्हापुरातून रत्नागिरीत येण्यासाठी अतिमहत्त्वाचा ठरणारा अनुस्कुरा घाटाची दुरवस्था झाली आहे. या घाटावरून जड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले असून वाहतूक अवघड झाली आहे. त्यामुळे, या रस्त्याच्या रुंदीकरणाला १० कोटींची तरतूद केली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

संपूर्ण बातमी वाचा – अणुस्कुरा घाटाचे लवकरच रुंदीकरण, अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद


सभागृहात कामकाज करत असताना सदस्य म्हणून प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार. भाष्य केलं म्हणून समितीत कार्यरत राहू शकत नाही, असं होत नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने मांडलेला मुद्दा मला अमान्य करावा लागेल. जी समिती स्थापन केली आहे ती कायदेशीररित्या गठीत केली आहे. नैसर्गिक न्यायाचा विचार करूनच गठीत केली आहे – राहुल नार्वेकर, अध्यक्ष

बातमी पूर्ण वाचा विशेषाधिकार समिती पुनर्गठित करा, अजित पवारांची मागणी अध्यक्षांनी केली अमान्य; कारण काय?


प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या आकडीवारीतून लोकांच्या डोळ्यात धुळफेक- अंबादास दानवे (विधान परिषद)

हर घर नाल योजनेत नल तर आले पण त्यात जल नाही- अंबादास दानवे


विशेषाधिकार समिती पुनर्गठित करा- अजित पवार

मीच मांडलं आणि मीच समितीत असेन तर न्याय होणार नाही

समितीची काम वादी-प्रतिवादी पद्धतीने प्रतिन्यायालयस्वरुप चालत असतं. जे वादी आहेत तेच निर्णय कसे घेणार. हे नैसर्गिक न्याय तत्वाला धरून होणार नाही.

या पद्धतीची नियुक्ती १०० टक्के कायदेशीर आहे – आशिष शेलार


विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे महागाईविरोधात आंदोलन


अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस

संजय राऊतांच्या हक्कभंग प्रस्तावावरून कालचा दिवस गाजला

सत्ताधाऱ्यांनी काल दिवसभरात एकच मुद्दा लावून ठेवल्याने इतर कामकाज झाले नाही. त्यामुळे आज कोणत्या मुद्द्यावरून चर्चा वादळी ठरणार हे पाहावं लागेल.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -