घरमहाराष्ट्रपावसाळ्यात दुर्घटना रोखण्यासाठी मोठी घोषणा; 15 जूनपासून 7 जिल्ह्यात 'NDRF'च्या 9 तुकड्या...

पावसाळ्यात दुर्घटना रोखण्यासाठी मोठी घोषणा; 15 जूनपासून 7 जिल्ह्यात ‘NDRF’च्या 9 तुकड्या तैनात

Subscribe

येत्या 5 ते 7 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. याच मान्सूनच्या पूर्व तयारीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली.

केरळमध्ये मान्सून दाखल होतात आता महाराष्ट्रातही कोकण आणि अन्य भागात मान्सूनचे आगमन होत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सूनदरम्यान नैसर्गिक दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढतेय. मात्र या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी वेळीत मदत आणि बचावकार्य सुरु पोहचवण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
(Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मान्सूनपूर्व (Monsoon) आढावा बैठक झाली, या बैठकीत यंदा पावसाळ्यात संभाव्य आपत्ती निवारण्यासाठी एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्वी तैनात करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य आपत्ती व्यवस्थापनेने केली आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनदरम्यानच्या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आता एनडीआरएफच्या टीमला वेळेत पोहचण्यास मदत होईल. (Pre Monsoon)

‘या’ जिल्हात एनडीआरएफची तुकडी राहणार तैनात

ठाणे, मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम 15 जूनपासून तैनात केली जाणार आहे. याचप्रकारे राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एनडीआरएफची एक तुकडी नांदेड आणि एक तुकडी गडचिरोली येथे 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

- Advertisement -

पावसाळ्यापूर्वीच एनडीआरएफच्या तुकड्या

विशेषत: पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका गेल्या काही वर्षांपासून वाढत असल्याने या घटनांच्या ठिकाणी ऐनवेळी मदत व बचावकार्य पोहचवण्यात उशीर होऊ नये म्हणून यंदा प्रथमच पावसाळ्यापूर्वीच एनडीआरएफच्या 9 तुकड्या राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

तसेच पावसाळ्यात धरणांतील पाण्याच्या विसर्गाचा प्रश्न दरवर्षी महत्वाचा मुद्दा असतो. अनेकदा धर फूटून किंवा धरणातील पाणी एकाचवेळी सोडल्याने आपत्तीजन्य घटना घडतात. त्यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी पूर नियंत्रण नियोजनाने व्यवस्थितरित्या करू शकतात, त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवर राहावे तसेच मुख्य अभियंत्याच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे निर्देश आजच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

दरम्यान पूर नियंत्रणाच्या दृष्टीने राज्यातील विविझ धरणांमधून किती पाण्याचा विसर्ग होणार आहे. याची माहिती वेळेवर मिळावी यासाठी जलसंपदा विभागाकडून एक यंत्रणा विकसित केली जातेय. या यंत्रणेद्वारे धरण क्षेत्रातील नागरिकांना आगाऊ सूचना मिळणार आहे. कोणतीही व्यक्ती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून ही माहिती 15 जूनपासून लाईव्ह पाहू शकेल.

यंदा मान्सून 16 मे रोजीच अंदामानमध्ये दाखल झाला आहे. तर 19 मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले. त्यामुळे येत्या 5 ते 7 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल (Monsoon in Maharashtra) होण्याचा अंदाज आहे. याच मान्सूनच्या पूर्व तयारीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली.


विविध सांस्कृतिक पुरस्कारांची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून घोषणा

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -