घरताज्या घडामोडीदसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी.., मिलिंद नार्वेकरांचं सूचक ट्वीट

दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी.., मिलिंद नार्वेकरांचं सूचक ट्वीट

Subscribe

मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा मिडियातून सुरू आहे. त्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे गटात जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर एक सूचक ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले मिलिंद नार्वेकर?

- Advertisement -

५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले, असं ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळ्यात केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक खळबळ उडाली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले आहे.

मिलिंद नार्वेकर आणि शिंदेंचे संबंध चांगले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही गणेशोत्सवात शिंदे गणपती दर्शनासाठी नार्वेकरांच्या घरी गेले होते. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु नार्वेकर कुठेही जाणार नाहीत, असे मला तरी वाटते. उगीच संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा हे योग्य नाही, असं शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं होतं.

मिलिंद नार्वेकरांनी ठाण्याच्या दुर्गेदुर्गेश्वरीचं दर्शन सुद्धा घेतलं होतं. परंतु त्यांनी त्यावेळीही प्रसार माध्यमांशी संवाद साधला नव्हता. पण त्यानंतरही नार्वेकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं असून ते नार्वेकरांची भूमिका काय असणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा; काँग्रेसची भूमिका अस्पष्ट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -