घरताज्या घडामोडीकितीही हिंदू, हिंदू ओरडलात तरी बुंदसे गयी वो हौदसे नही आती, मनसेचं...

कितीही हिंदू, हिंदू ओरडलात तरी बुंदसे गयी वो हौदसे नही आती, मनसेचं शिवसेनेवर टीकास्र

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मशिदींच्या भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असे आव्हान मनसेकडून देण्यात आला असून ३ मेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. तसेच आता हिंदुत्वाचा मुद्दा देखील पुढे आला आहे. सत्तेत आल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला अशी टीका करण्यात येत आहेत. तर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नव पुरोगाम्यांना आपण हिंदू असल्याची जाणीव राज ठाकरेंनी करुन दिली आहे. आता कितीही हिंदू, हिंदू म्हणून ओरडलात तरी बुंदसे गयी वो हौद से नही आती अशी टीका संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधण्यात येत आहे. घंटाधारी हिंदुत्व नको तर आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे नेहमीच नव हिंदुत्ववाद्यांवर आपल्या भाषणातून टीकास्त्र डागत असतात. परंतु सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा विसर पडला असल्यामुळे विरोधक निशाणा साधत असतात. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, अजान ची स्पर्धा भरवणारे, हनुमान चालिसाला विरोध करणारे नव पुरोगामीच.आणि नव पुरोगाम्यांना आपण हिंदू आहोत याची जाणीव करून देणारे राजसाहेबच. आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी “बुंदसे गयी वो हौद से नहीं आती” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

- Advertisement -

हनुमान चालिसावरुन राजकीय वादंग

मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावे अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच ३ मे पर्यंत जर राज्य सरकारने कारवाई केली नाही तर महाराष्ट्रात सगळीकडे मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. राज ठाकरेंच्या आव्हानानंतर भोंग्यांवरील कारवाईला वेग आला असून राज्य सरकारकडून नियमावली काढली जाऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या इशार्‍याने मुंबईत हिंसाचार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -