घरताज्या घडामोडीMonsoon Updates : येत्या 5 दिवसांत राज्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Monsoon Updates : येत्या 5 दिवसांत राज्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Subscribe

राज्यात (Maharashtra) अनेक भागांत येत्या ५ दिवसांत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने मान्सूनबाबत माहिती दिली होती.

राज्यात (Maharashtra) अनेक भागांत येत्या ५ दिवसांत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने मान्सूनबाबत माहिती दिली होती. परंतु, मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याने गेले चार दिवस मान्सून कर्नाटकातल्या कारवापर्यंत येऊन थांबला आहे. मात्र आता ५ दिवसांत पाऊस दाखल होणार असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलास मिळणार आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाल्याने मान्सून कर्नाटकातच थांबला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मात्र तरीही येत्या ५ दिवसांत राज्यातल्या अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सिंहगड किल्ला घाट रस्त्यावर संरक्षक जाळ्या; मान्सूनपूर्व कामांना वेग

मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूनने केरळात प्रवेश केल्यानंतर ३१ मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवापर्यंत पोहोचला आहे. यानंतर गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळे मान्सून केवळ २ दिवसांत केरळमध्ये पोहोचेल, असे भाकीत हवामान विभागाने केले होते. पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला.

- Advertisement -

दरम्यान, पश्चिम बंगालच्या काही शहरांसह, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांत मान्सूनने धडक दिली आहे. शिवाय, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला असून, अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्ययुक्त वाऱ्यांमुळे कर्नाटक, केरळ, लक्षद्विप, तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागातही पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा – राज्यसभा निवडणुकीत शरद पवार १९९८ ची पुर्नरावृत्ती करणार का?, पवारांनी दाखवला होता काँग्रेसच्या उमेदवाराला कात्रजचा घाट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -