सीमाबांधवांचा प्रचार करावा; राऊतांचे शिंदे-फडणवीसांना आव्हान

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बेळगावात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावात गेले आहेत. या निवडणुका लक्षात घेता नुकताच संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Shiv Sena's next MLA from Loha-Kandahar, Sanjay Raut expressed his belief

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बेळगावात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावात गेले आहेत. या निवडणुका लक्षात घेता नुकताच संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. (MP Sanjay Raut Slams Maharashtra CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis)

खासदार संजय राऊत यांची बुधवारी सकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. “महाराष्ट्र एकिकरण समितीच्या प्रचाराला शिवसेना वारंवार जात असते. ही आमची कमिटमेंट आहे. बेळगाव, कारवार, निपाणी इतर सीमाभाग हा महाराष्ट्रात यायलाच पाहिजे असे, जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तिकडच्या मराठी जनतेच्या पाठिशी आम्ही उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बेळगावात जाऊन सीमाबांधवांचा प्रचार करावा, असे आव्हान मी कालपासून आव्हान करत आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगत होते की, आम्ही बेळगावच्या लढ्यात होते आणि तुरुंगवास भोगला. तर खरोखरंच तुरुंगवास भोगला असेल आणि बेळगावच्या लढ्याविषयी जाणीव असेल तर, त्यांनी सर्व जुगारून बेळगावात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या प्रचारात जावे. आम्हीसुद्धा जाणार आहोत”, असे संजय राऊत म्हणाले.

“माझ्याविरोधात बेळगाव पोलिसांचे वारंट आहे. त्यामुळे बेळगावात दाखल झाल्यानंतर सर्वातआधी मला कोर्टात जावे लागेल, त्यानंतर कायदेशीर प्रक्रीय पूर्ण केल्यानंतर मला पुढील कार्यक्रमांना जात येईल. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी इथे बसून सुस्कारे सोडू बेळगावच्या विषयी किंवा राज्यपालांच्या भाषणामध्ये सीमाभाग आमचाच असे बोलून चालणार नाही. बेळगावातील मराठी माणसांच्या पाठी तुम्ही उभं राहण्याची हिंमत दाखवत नसाल तर, सगळं व्यर्थ आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“कर्नाटकात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव व्हावा यासाठी देवेंद्र फडणीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील भाजपाच्या मराठी नेत्यांच्या फौजा तेथे पाठवल्या आहेत आणि ही लोक मराठी एकिकरण समितीच्या उमेदवारंचा पराभव करण्यासाठी तेथे ठाण मांडून बसले आहेत. तसेच, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसाही तिथे गेला आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी तिकडे जाऊन माती खावी किंवा काही खावं, त्यांनी कोणाचाही प्रचार करावा पण माझी भूमिका आहे की, बेळगावात मुख्यमंत्री जात असतील त्यांनी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करावा”, असा टोलाही राऊतांनी शिंदेंना लगावला.


हेही वाचा – ‘निवृत्त पदाधिकारी होतात, जनतेच्या मनातील राजे…’, पुण्यात पवारसमर्थकांची बॅनरबाजी