घरताज्या घडामोडीशिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल; राणे पिता-पुत्राकडून संजय राऊतांवर निशाणा

शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल; राणे पिता-पुत्राकडून संजय राऊतांवर निशाणा

Subscribe

भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना निशाण्यावर घेतलं असून संजय राऊत हे कपटी, कारस्थानी आणि दुष्ट असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहे. येत्या काळात काय होईल याची काहीच शाश्वती नसल्याचं सांगण्यात येतंय. यादरम्यान, विरोधी पक्षांकडून शिवसेनेतील अनेक नेत्यांवर टिकेचे बाण सुरू आहेत. भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे पूत्र नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना निशाण्यावर घेतलं असून संजय राऊत हे कपटी, कारस्थानी आणि दुष्ट असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे. (Narayan Rane and Nitesh Rane tweet against Sanjay Raut)

हेही वाचा – विधानसभा बरखास्तीच्या दिशेने.., खासदार संजय राऊतांचे संकेत

- Advertisement -

नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वैर उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. शिवसेनेला रामराम ठोकून नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, काँग्रेसलाही त्यांनी सोडचिठ्ठी देत भाजपला जवळ केले. दरम्यान, शिवसेनेवरचा त्यांचा राग कमी झाला नाही. त्यांनी नेहमीच शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर आगपाखड केली. संजय राऊत यांच्यावर तर ते सतत निशाणा साधत असतात. आता, संजय राऊत यांच्या स्वभावामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज ट्विट करून संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडलं.

हेही वाचा शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना अल्टिमेटम, आजच्या बैठकीत हजरा राहा, अन्यथा…

- Advertisement -

नारायण राणे यांनी ट्विट करत म्हटलं की, संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.

नारायण राणे यांच्या ट्विटला अनेकांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे शरद पवारांचे पगारदारी माणूस असल्याचं एका नेटिझनने त्यांच्या ट्विटखाली म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार, असं नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -