घरमहाराष्ट्रएकटे मोदी सर्व विरोधकांवर भारी; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

एकटे मोदी सर्व विरोधकांवर भारी; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Subscribe

एकटे मोदी सर्व विरोधकांवर भारी, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडतील, असा दावा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. आम्ही जनतेच्या दारी जातो मात्र महाविकास आघाडी सरकार झोपलं होतं, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

एकटे मोदी सर्व विरोधकांवर भारी, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडतील, असा दावा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. आम्ही जनतेच्या दारी जातो मात्र महाविकास आघाडी सरकार झोपलं होतं, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ऑनलाईन काम करणाऱ्यापेक्षा फिल्डवर जाऊन जो काम करतो त्याच्या मागे जनता उभी राहते, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. रत्नागिरीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आयोजनावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ( Narendra Modi alone overpowers all opponents CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray )

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 2019 ला देखील विरोधक एकत्र आले होते. 2014 पेक्षा 2019 ला जास्त जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात मिळाल्या. त्यावेळचं वातावरण आपण सर्वांनी पाहिलं. विरोधक हे 2019 ला पालापाचोळ्यासारखे उडून गेले. शेवटी मोदींचं काम बोलतं. विरोधक कितीही एकत्र आले तरीही एकटे मोदी हे सर्वांवर भारी आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

राज्यातील जनता ही सुज्ञ आहे. मागची अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार हे घरी झोपलं होतं, घरी बसलं होतं. आज आम्ही लोकांच्या दारी, शासनाच्या योजना घेऊन जात आहोत मग लोकं कोणाच्या बाजूने उभे राहणार? घरात बसून, फेसबूक लाईव्ह करणाऱ्या माणसाला लोक पाठिंबा देतील की फील्डवर उतरुन काम करणाऱ्यांना देतील? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

( हेही वाचा: ‘ना नेता, ना नीती’; विरोधकांनी राष्ट्रपती-राज्यपालांना डावलत केलेल्या उद्घाटनांची फडणवीसांनी वाचली यादी )

- Advertisement -

सगळे खुर्चीचे ‘सौदागर’

विरोधकांकडे ‘ना नेता आहे ना नीती’ आहे. त्यामुळे विरोधकांचं जे नरेंद्र मोदींना हरवण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. देशानं पहिल्यांदा स्वतंत्र भारताची स्वत:ची अशी संसद तयार केली आहे. हे संसद भवनाची आसन क्षमता जास्त आहे. तसचं, आधुनिकतेनं ती परिपूर्ण आहे. तर अशा संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार का? याचाच अर्थ असा की, हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत. सत्तेचे सौदागर आहेत. मोदींचा मुकाबला करु शकत नाहीत, म्हणून हे सगळे एकत्र आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -