घरताज्या घडामोडीरुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने अशोका मेडीकव्हरवर गुन्हा दाखल

रुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने अशोका मेडीकव्हरवर गुन्हा दाखल

Subscribe

कोरोनाकाळात प्रथमच महापालिकेने दिली फिर्याद; चार रुग्णांकडून ३ लाख ८० हजार अतिरिक्त आकारले

शासन निर्णयातील नमूद दरापेक्षा जास्त दराने रुग्णांकडून शुल्क आकारल्या प्रकरणी नाशिक महापालिकेने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चार रुग्णांकडून एकूण ३ लाख ८० हजार ४८८ रुपये इतकी रक्कम अधिक आकारल्याने आणि महापालिकेने नोटीस देऊनही ती परत न केल्याने या हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांवर पालिकेच्या लेखापरीक्षकांनी फिर्याद दाखल केली आहे. कोरोनाकाळात महापालिकेने हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची नाशिकमधील ही पहिलीच घटना आहे.
कोविड-१९ च्या आजारावर उपचार घेण्यासाठी अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे रुग्ण दाखल झाले असता त्यांना
शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दर रुग्णांना आकारले. याबाबत रुग्णांकडून महापालिकेस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

महापालिकेला प्राप्त झालेल्या या आहेत तक्रारी :

  • दिलीप संपत आहेर या रुग्णाने केलेल्या तक्रारीनुसार ते २४ मे ते ७ जून या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने १ लाख २५ हजार ९१९ रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार पालिकेकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकवर रुग्णालयास ११ जून रोजी नोटीस देण्यात आली. तसेच २ जुलै रोजी पैसे परत करण्याबाबत पत्र देण्यात आले होते. त्यानंतर १७ जुलैला पैसे परत न केल्यास नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे पत्र देण्यात आले होते.
  • सुरेश लखीचंद लुंकड या रुग्णाने केलेल्या तक्रारीनुसार १६ मे ते ९ जून या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने १६ हजार ९७९ रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार पालिकेस प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकवर रुग्णालयास १७ जुलै रोजी नोटीस देण्यात आली. तसेच ५ ऑगस्ट रोजी पैसे परत करण्याबाबत पत्र देण्यात आले होते.
  • सचिन नारायण कोरडे या रुग्णाने केलेल्या तक्रारीनुसार २८ मे ते १३ जून या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने ७७ हजार ९२० रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार पालिकेकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकवर रुग्णालयास २० ऑगस्ट रोजी नोटीस देण्यात आली होती.
  • शेख सलीम हाजीसदर मोहंमद या रुग्णाने केलेल्या तक्रारीनुसार २६ जून ते २० जुलै या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने १ लाख ५९ हजार ६७० रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार पालिकेस प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलला २८ ऑगस्टला नोटीस देण्यात आली. तसेच ८ सप्टेंबरला पैसे परत करणे बाबत पत्र देण्यात आले होते. त्यानुसार या हॉस्पिटलच्या व्यवस्थापक यांना नोटीस बजावण्यात आली होती.

महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्याने आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई

सदरच्या ४ रुग्णांना जादा आकारलेली एकूण ३ लाख ८० हजार ४८८ रुपये इतकी रक्कम परत न केल्याने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांना अंतिम नोटीस देण्यात आली होती. सदर नोटीस अन्वये मुदतीत पूर्तता न केल्याने महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल यांनी शासन अधिसूचनेच्या २१ मे व ३१ ऑगस्ट अन्वये दिलेल्या निर्देशांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे वरील चार रुग्णांकडून आकारलेली ३ लाख ८० हजार ४८८ रुपये अंतिम नोटीस नुसार मुदतीत परत करण्यात आलेले नाही.

- Advertisement -

या कलमान्वये गुन्हा दाखल :

रुग्णालय व्यवस्थापना विरुद्ध साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम -२००५, महाराष्ट्र कोविड-१९ उपाय योजना नियम २०२० यातील विविध तरतुदींचा भंग केलेला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ च्या कलम २ व ३ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५८, मुंबई नर्सिंग होम (सुधारणा)अधिनियम २००६ चे कलम ७ व १७ (२) अशोका रुग्णालया विरुद्ध महापालिकेच्या लेखापरीक्षकांनी मुंबई नाका, पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे.

रुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने अशोका मेडीकव्हरवर गुन्हा दाखल
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -