घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक पदवीधर निवडणूक : "महिलांना पैठणी साड्या तर पुरुषांना ५ हजार वाटले"

नाशिक पदवीधर निवडणूक : “महिलांना पैठणी साड्या तर पुरुषांना ५ हजार वाटले”

Subscribe

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक सुरुवातीपासूनच अतिशय रंजक ठरली होती. मतदानाच्या दिवशी सुद्धा तब्बल 50% पर्यंत मतदानाची टक्केवारी गेली जी आत्तापर्यंतची सर्वाधिक मानली जात आहे. आज मतमोजणीच्या प्रक्रियेला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली. नाशिकच्या सय्यद पिंपरी गावाजवळ मतमोजणी सुरू आहे. अशातच आता निकालाला अवधी असला  तरीसुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी एका धनाढ्य महिला मतदारांना ५ हजाराची पैठणी तर पुरुष मतदारांना पाच हजार रुपये पाकिटात टाकून वाटल्याचा गंभीर आरोप केलाय. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

खरंतर संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लागून आहे. आज एकूण सोळा उमेदवारांचे भवितव्य काय असणार याचा फैसला होणार आहे. त्यासाठी मतमोजणीला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र, ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होण्याच्या सुरुवातीलाच अपक्ष उमेदवार आणि नगर जिल्ह्यातून येणारे मूळचे काँग्रेस पक्षाचे त्यानंतर शिवसेनेमध्ये दाखल झालेले सुभाष जंगले यांनी मोठा गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुभाष जंगले म्हणाले की, खर तर ही पदवीधरांची निवडणूक सुशिक्षतांची निवडणूक मात्र या पदवीधरांनाही आर्थिक प्रलोभन दाखवून त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न झालाय, महिला मतदारांना ५ हजारांची पैठणी साडी आणि पुरुष मतदारांना ५ हजार रुपये रोख पाकिटात टाकून वाटण्यात आले आहे, हे एका धनाढ्य उमेदवाराकडून झाले असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

सुभाष जंगले यांचा  नेमका रोख कोणाच्या दिशेने आहे. तसेच, खरंच या निवडणुकीमध्ये असा काही प्रकार घडला का हे बघणे देखील महत्त्वाचे असणार आहे. मात्र, मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर निकाल येण्याला अवधी असतानाच अशा पद्धतीच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याने ह्या निवडणुकीची रंगत अधिक वाढताना दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -