घरमहाराष्ट्रनाशिककांदा गडगडला, साडेपाचशे रुपयाची घसरण

कांदा गडगडला, साडेपाचशे रुपयाची घसरण

Subscribe

कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

लासलगाव : देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दाखल झाल्याने कांद्याची नगरी असलेल्या लासलगावात कांद्याच्या बाजारभावात साडेपाचशे रुपये प्रतिक्विंटलने घसरल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

देशांतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी आणि लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने तसेच राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भाव वर झाला आहे.

- Advertisement -

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी कांद्याच्या कमाल बाजारभावात साडे पाचशे रुपयांनी घसरण झाली आहे. शनिवारी १ हजार २३३ वाहनांतून १७ हजार ८२६ क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल २६२५ रुपये, किमान ६५१ रुपये तर सर्वसाधारण २१०० रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाले होता तर सोमवारी १ हजार ८५० वाहनातून ३२ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल २०७७ रुपये, किमान ९०० रुपये तर सर्वसाधारण १७५० रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला देशांतर्गत कांद्याची आवक वाढल्यावर कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असते, यंदा मात्र एक महिना उशिराने कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली आहे. त्यात आता रशिया आणि यूक्रेन युद्धांचा परिणामही कांद्याच्या बाजारभाव येणार्‍या दिवसात दिसणारा आहे. कांद्याची निर्यात ही कमी जरी असली तरी त्याच्यावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा व्यापारी वर्गात होत असल्याने याकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सचिव नरेंद्र वाढवणे सांगत आहेत.

कांदा सरासरी भाव (प्रती क्विंटल)

  • १८ फेब्रुवारी२४८०
  • २१ फेब्रुवारी२४३०
  • २२ फेब्रुवारी२३७०
  • २४ फेब्रुवारी२२२५
  • २६ फेब्रुवारी२३०१
  • २८ फेब्रुवारी१७५०
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -