घरमहाराष्ट्रनाशिकमराठी नंबर प्लेट असल्याने दंड; सेना नगरसेविका जाधव आक्रमक

मराठी नंबर प्लेट असल्याने दंड; सेना नगरसेविका जाधव आक्रमक

Subscribe

इंदिरानगर : वाहनांवरील नंबर प्लेट इंग्रजीत असावी असे नियम असले तरी देखील किमान महाराष्ट्रात मराठीतून नंबर प्लेट असलेल्या वाहनांना तरी त्यातून सूट मिळावी अशी मागणी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे माजी नगरसेविका संगीता जाधव केली आहे.

एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला असतांना दुसरीकडे मात्र वाहनांवर मराठी भाषेतील नबंर प्लेट अनधिकृत ठरवत पोलिसांनी वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

पाथर्डी फाटा चौकात वाहतूक पोलिसांनी वासन नगर भागात राहणार्‍या प्रकाश पवार यांना त्यांच्या चारचाकीची नंबर प्लेट मराठीत असून हे नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांना पाचशे रुपये दंड केला.स्थानिक पातळीवर सहसा मराठीतून नंबर प्लेट असली तर पोलीस नियमबाह्यअसले तरी दंड करत नाहीत सध्या वैद्यकीय अभ्यासक्रम देखील मराठीत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .शिवाय दुकाने,हॉटेल,कंपनी आणि इतर आस्थापनावरील पाट्या देखील मराठीतुन हव्यात अशी सक्ती होत असताना वाहनांवर जर मराठी पाटी असेल तर त्याला देखील सवलत मिळावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. मराठीतील नंबर प्लेट असलेल्या वाहनांना सूट मिळावी यासाठी अधिकृत मागणी करणार असल्याचे शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक अमोल जाधव,शैलेश कार्ले,रवींद्र वाटेकर,बाळासाहेब काळे, दीपक पंडित आदींनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -