घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील झाडांना लागणार क्यूआर कोड

शहरातील झाडांना लागणार क्यूआर कोड

Subscribe

आदिश्री पगार या चिमुकलीच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतूक

नाशिक : उंटवाडीतील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात येणार असल्याने हा मुद्दा चांगलाच तापला आहे. ही झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेतली. आता नाशिकमधील इतर वृक्षांना वाचवण्यासाठी एका चिमुकलीने क्यूआर कोड विकसित केला असून याद्वारे त्या झाडाची संपूर्ण माहिती याद्वारे मिळण्यास मदत होणार आहे.

त्रिमूर्ती चौक ते मायको सर्कल उड्डाणपुलासाठी उंटवाडीतील अडीचशे वर्षे जुना वटवृक्ष तसेच ५८८ झाडे तोडण्यासाठी महापालिकेने झाडांवर नोटीसा चिकटवल्या आहेत. परंतु पर्यावरणप्रेमींनी ही झाडे तोडण्यास विरोध दर्शवला असून या झाडांना हेरिटेज दर्जा देण्याची मागणी करण्यात येत आहे. आता या मोहिमेत आदिश्री या चिमुकलीने सहभाग नोंदवत खास क्यूआर कोड विकसित केला आहे. यामुळे सभोवतालच्या झाडांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तिने हे कोड आजूबाजूच्या झाडांवर लावले.

- Advertisement -

हे कोड मोबाईलवरील क्युआर कोड स्कॅनरने स्कॅन करताच, त्या झाडाची संपूर्ण माहिती मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते. आदिश्रीने उंटवाडीतील वटवृक्षाचा क्युआर कोड झाडावर लावला असून यापुढे नाशिकमधील वृक्षांना क्यूआर कोडव्दारे जपण्यास तिने सुरुवात केली आहे. या उपक्रमाचे सर्वांकडून कौतूक होत आहे.

ही माहिती मिळणार 

त्या झाडाची संपूर्ण माहिती, झाडाचे मराठी, इंग्रजीसह अन्य भाषेतील नाव, झाडाचे कार्य, उपयुक्तता, मूळ स्थान, ते जगभरात कोठे आढळते अशी सर्व माहिती मिळणार आहे.

क्यूआर कोडमुळे झाडांची माहिती मिळेल, त्यामुळे त्यांची ओळख होईल आणि आपण त्यांची काळजी घ्यायला शिकू.

– आदिश्री पगार, विद्यार्थिनी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -