घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मधील वर्कर्स स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे क्रीडा शिक्षकांना शिवप्रेरणा पुरस्कार

नाशिक मधील वर्कर्स स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे क्रीडा शिक्षकांना शिवप्रेरणा पुरस्कार

Subscribe

आर. के. लॉन्स येथे नुकताच हा सोहळा मोठ्या उत्साहात पार

नाशिक : वर्कर्स स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे क्रीडा शिक्षकांना आदर्श शिवप्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पाथर्डी गावाजवळील आर. के. लॉन्स येथे नुकताच हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार सीमा हिरे, महेश हिरे, नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी पल्लवी धात्रक, राजेंद्र महाले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र निंबाळते, इंदिरानगरचे पोलीस निरीक्षक एस. आर. बांबळे, क्रीडाधिकारी संदीप ढाकणे, वर्कर्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष जी. के. चव्हाण, सचिव उत्तम उघाडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार्थी असे... गणेश राऊत (सेक्रेड हार्ट), हिरामण शिंदे, (देवराम नारायण पाटील माध्यमिक विद्यालय गंगापूर), संदीप पाटील, (स्वामी नारायण स्कूल), सर्वेश देशमुख (सेंट लॉरेन्स), मच्छिंद्र सोनवणे (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल), कीर्ती गायकवाड (रचना विद्यालय, नाशिक), मिनाक्षी गिरी, दगडू तेलोरे (महर्षी पुंजाबाबा गोवर्धने) व पत्रकार किशोर चौधरी, सचिन दिवटे, राजेंद्र बच्छाव, दामोधर थोरात यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -