घरताज्या घडामोडीMaharashtra Budget Session 2022 Live Update: महाराष्ट्र विधानपरिषदेचे पुढील अधिवेशन १८ जुलै...

Maharashtra Budget Session 2022 Live Update: महाराष्ट्र विधानपरिषदेचे पुढील अधिवेशन १८ जुलै रोजी मुंबईत होणार, विधानपरिषदेच्या सभापतींची घोषणा

Subscribe

महाराष्ट्र विधानपरिषदेचे पुढील अधिवेशन १८ जुलै रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात केली.


मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जलदगतीने प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी घोषणा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमीतीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत केली.

- Advertisement -

एसटी संपावर तोडगा काढा. सरकारने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार कपिल पाटल यांनी केली.


पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर शेळके यांनी लक्षवेधी लावण्याची मागणी केली होती. मात्र ती लागत नसल्यानं ते नाराज झाले.
——————————————————————————-
जळगावच्या दुकानदारांना मदत करण्यासाठी तरतुदी बदलल्या, त्या दुकानदारांच्या अंगलट आल्या- देवेंद्र फडणवीस
———————————————————————————————–
बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेता येत नाही. सहकार मंत्री एमएससी बँकेचा आढावा घेत असतात. सहकार चळवळ टिकवण्यासाठी राज्य सहकारी बँकांचं मोठं योगदान आहे- अजित पवार
————————————————————————————————
बॅंकेवर सलग दहा वर्ष एकच प्रशासक असल्यानं तातडीनं निवडणूक जाहीर करावी, शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांची मागणी
बँकेच्या कामकाजामध्ये झालेल्या अनियमिततेमुळे रिजर्व्ह बँकेच्या सुचनेनुसार शासनाच्या सहकार विभागानं मे, 2011 रोजी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती.
त्यानंतर आतापर्यॅत हे प्रशासकीय मंडळ कार्यरत  असल्यानं शिवसेनेची नाराजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन करून विनंती केली आहे
मुख्यमंत्री न्याय देतील प्रकाश आबिटकरांना विश्वास
—————-

- Advertisement -

विधानसभा सभागृह कामकाजाचा आज १५वा दिवस आहे. आजच्या कामकाजाला सुरुवात झाली असून लक्षवेधीवर चर्चा सुरू आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -