घरक्राइमअंबड लिंकरोड वरील 'त्या' भंगार गोदमाला पुन्हा आग

अंबड लिंकरोड वरील ‘त्या’ भंगार गोदमाला पुन्हा आग

Subscribe

नवीन नाशिक: अंबड लिंक रोड परिसरातील आझाद नगर येथील एका प्लास्टिक भंगार गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अंबड लिंक रोड परिसरातील आझाद नगर येथील ह्या प्लास्टिक भंगारच्या गोदामाला एकाच महिन्यात तीन वेळेस आग लागल्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच महानगरपालिका व सातपूर,अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाच्या जवानांनी एक ते दीड तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले.
दरम्यान अंबड लिंक रोडवरील भंगार बाजारातील या गोदामाला एकाच महिन्यात तीन वेळा आग लागते कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने या गोदाम मालकाला जागेच्या मूळ मालकाबद्दल माहिती विचारली असता त्यांच्याकडे या प्रश्नाचे कुठलेही उत्तर नसल्याने आगीची घटना संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
दरम्यान आग लागल्याचे वृत्त समजतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -