घरमहाराष्ट्रनाशिक९०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद अद्याप प्रलंबितच

९०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद अद्याप प्रलंबितच

Subscribe

त्वरीत नोंदणी करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली, तरी दररोज शेकडो रुग्णांचे मृत्यू होत असल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, पहिल्या लाटेत मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती अपडेट न केल्याने ती आता अपडेट केली जात आहे. त्यामुळे प्रशासन मृत्यूचा आकडा लपतोय की काय, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. मात्र, आकडेवारी लपवण्याचा प्रश्नच नसून एकूणच प्रशासनावर या काळात असलेला ताण पाहता ती प्रलंबित राहिली असून ही नोंदणी त्वरीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे समोर येणारे आकडे पाहता प्रशासनाकडून हे आकडे लपवले जात असल्याबाबत आरोप करण्यात येत आहे. मात्र, याबाबत बोलताना जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या साप्ताहिक कोरोना आढावा बैठकीत ५२२ नोंदी बाकी असल्याची माहीती दिली गेली होती. मात्र, खासगी रुग्णालयांकडून अजूनही माहितीच भरलेली नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे अजूनही नऊशेहून अधिक मृत्यूंच्या नोंदी झालेल्याच नाहीत. मृत्यूच्या नोंदी लपवण्यातून हा प्रकार नसल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. केवळ नाशिकच नव्हे तर, संपूर्ण राज्यात यंत्रणेकडून माहिती अपडेट केली जात आहे. एकूणच कोरोना रुग्णांची वाढती संख्या, कर्मचार्‍यांवर वाढता कामाचा ताण, तांत्रिक अडचणी, खासगी रुग्णालयांकडून केली जाणारी चालढकल यामुळे या नोंदी प्रलंबित राहील्या आहेत. मात्र या नोंदी त्वरीत करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

माहिती मागवली

याबाबत जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांना नोटीस दिल्याचे सांगितले जाते. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना विचारले असता अशी कोणतीही नोटीस बजावलेली नाही, जिल्ह्यातील किती रुग्णांची मृत्यू नोंद प्रलंबित आहे, याची माहिती मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Dr.Anand Pawarरविवारपर्यंत स्थानिक यंत्रणांनी कोरोना मृत रुग्णांची आकडेवारी पोर्टलवर अपडेट    करावी, अन्यथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस नाशिक महापालिका नोडल अधिकारी, नाशिक ग्रामीण निवासी वैद्यकीय अधिकारी व मालेगावचे आरोग्य अधिकार्‍यांना बजावली आहे. सर्व शासकीय व खासगी संस्थांमधील                           प्रलंबित आकडेवारी अपडेट करण्यास सांगितले आहे. आकडेवारी  अपडेट न केल्यास                            अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करत संबंधित हॉस्पिटलवर कारवाई केली जाणार                   आहे.

– डॉ. आनंद पवार, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -